विजयी ठरलेले नाराज तर पराजित तोऱ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:39+5:302021-07-01T04:07:39+5:30

शिरीष खोेबे नरखेड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संपन्न झाली. विजयी झालेल्या सदस्यांचा पदग्रहण सोहळाही झाला. सर्व ...

The victors are angry, but the losers are angry! | विजयी ठरलेले नाराज तर पराजित तोऱ्यात!

विजयी ठरलेले नाराज तर पराजित तोऱ्यात!

Next

शिरीष खोेबे

नरखेड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संपन्न झाली. विजयी झालेल्या सदस्यांचा पदग्रहण सोहळाही झाला. सर्व सदस्य आपापल्या सर्कलच्या समस्या सोडविण्यासाठी कामीही लागले. यातच कोरोना महामारी आली. त्यावेळी गावाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी रात्रीचा दिवस करून कोरोनाला दूर ठेवण्यात यांचाही वाटा होता. त्याच वेळी कुणाला गोठा, विहीर, घरकुल, ग्रीन हाऊस, मोटरपंप आदींची यादी तयार करीत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील इतर मागासवर्गीयांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रद्द करण्यात आले. त्याचा फटका तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या चार सदस्यांना बसला. यात जि.प.चे सावरगाव, भिष्णूर सर्कल तर पं.स.चे सावरगाव, बेलोना गणाचा समावेश आहे. आता या जागांवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केल्यामुळे गतवेळी वेळी विजयी झालेले उमेदवार आता आपले कसे होईल, या चिंतेत आहेत. खर्च होऊन गेला, मात्र पाच वर्षे सत्ता उपभोगता आली नाही म्हणून नाराज आहेत. तर ज्यांना गतवेळी पराभव पत्करावा लागला, त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

तालुक्यातील सावरगाव जि.प. सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवका पुरुषोत्तम बोडखे यांनी ३२० मतांनी विजय प्राप्त करीत भाजपाच्या पार्वता काळबांडे यांचा पराभव केला होता. काळबांडे अजूनही नशीब अजमविण्याच्या तयारीत आहेत. पण देवका बोडखे यांनी विजयी झाल्यानंतर जनसंपर्क तगडा ठेवला होता, तरीही पक्ष काय निर्णय घेतो, त्यावर सर्व अवलंबून आहे. भिष्णूर जि.प. सर्कलमधून राष्ट्रवादीच्या पूनम प्रवीण जोध यांनी २,३१२ मतांनी विजय प्राप्त करीत भाजपाच्या पुष्पा वसंत चाफले याचा पराभव केला होता. जोध यांचे मताधिक्य जास्त असल्यामुळे त्या पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

सावरगाव पं.स. गणातून विजयी झालेले वैभव वासुदेव दळवी यांनी ५०० मतांनी भाजपाचे स्वप्निल नागापुरे याचा पराभव केला होता. सदस्यपद गेल्यानंतरही ते मैदानात कायम राहिले. बेलोना गणात राष्ट्रवादीच्या रश्मी अशोक आरघोडे यांनी ४१३ मतांनी विजय प्राप्त करीत हेमलता गोपाळ सातपुते यांना पराभूत केले होते. त्यासुद्धा पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. मात्र यावेळी निवडणूक खुल्या प्रवर्गातून होणार असल्याने उपरोक्त चारही ठिकाणी उमेदवारांची संख्या निश्चितच वाढणार आहे.

Web Title: The victors are angry, but the losers are angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.