विदर्भात २,५३३ रुग्ण, ८१ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:08 AM2021-03-31T04:08:25+5:302021-03-31T04:08:25+5:30

नागपूर : विदर्भात इतर दिवशी दैनंदिन ५० हजारांवर चाचण्या होत असताना व ७ हजारावर रुग्णांची नोंद होत असताना सोमवारी ...

In Vidarbha, 2,533 patients, 81 died | विदर्भात २,५३३ रुग्ण, ८१ मृत्यू

विदर्भात २,५३३ रुग्ण, ८१ मृत्यू

Next

नागपूर : विदर्भात इतर दिवशी दैनंदिन ५० हजारांवर चाचण्या होत असताना व ७ हजारावर रुग्णांची नोंद होत असताना सोमवारी धुळवडच्या दिवशी ११ जिल्हे मिळून केवळ १५,०८५ चाचण्या झाल्या. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना चाचण्या कमी होणे हे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकूण २,५३३ नव्या रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या कमी असली तरी मृत्यूचा दर वाढलेलाच आहे. मागील २४ तासात ८१ रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यातही इतर दिवशी १६ ते १७ हजाराच्या घरात जाणाऱ्या चाचण्या सोमवारी ४,६०४ झाल्या. यामुळे ४ हजारावर जाणारी रुग्णसंख्या ११५६ वर थांबली. परंतु मृत्यूचा आकडा वाढलेलाच आहे. ५४ रुग्णांचे बळी गेले. नागपूरनंतर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १३ रुग्णांचे मृत्यू झाले. २४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बुलडाण्यात ५१८ रुग्ण पॉझिटिव्ह व एका रुग्णाचा मृत्यू झाला. वाशिममध्ये २४२ रुग्ण, अकोल्यात १०४ रुग्ण व ४ मृत्यू, अमरावतीत १०८ रुग्ण व २ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात २२ रुग्ण व ४ बळी, भंडारा जिल्ह्यात ३३ रुग्ण व १ मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात ३७ रुग्ण व १ मृत्यू तर गोंदिया जिल्ह्यात २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात कमी चाचण्या झाल्या. ९८ चाचण्यामधून २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर, एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

नागपूर : ११५६ : २२३१५३ : ५४

चंद्रपूर : ३९ : २७४७७ : ०१

वर्धा : २२ : १८३६१ : ०४

अमरावती : १०८ : ४८३७६ : ०२

भंडारा : ३३ : १७०७९ : ०१

गोंदिया : २७ : १५९४४ : ००

यवतमाळ : २४७ : २८१३६ : १३

गडचिरोली : ३७ : १०५५५ : ०१

वाशिम : २४२ : १५८६७ : ००

बुलडाणा : ५१८ : ३७११४ : ०१

अकोला : १०४ : २७४४४: ०४

Web Title: In Vidarbha, 2,533 patients, 81 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.