विदर्भात सात दिवसांत ५२,७९१ रुग्ण, ४९९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:25+5:302021-03-28T04:08:25+5:30

नागपूर : विदर्भातील अकराही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. १९ ते २६ मार्च या सात दिवसांत तब्बल ...

In Vidarbha, 52,791 patients, 499 deaths in seven days | विदर्भात सात दिवसांत ५२,७९१ रुग्ण, ४९९ मृत्यू

विदर्भात सात दिवसांत ५२,७९१ रुग्ण, ४९९ मृत्यू

Next

नागपूर : विदर्भातील अकराही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. १९ ते २६ मार्च या सात दिवसांत तब्बल ५२,७९१ नव्या रुग्णांची भर पडली तर, ४९९ रुग्णांचे जीव गेले. आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा व मृत्यूसंख्येचा हा उच्चांक आहे. धक्कादायक म्हणजे, सध्याच्या स्थितीत ६४ हजार ६४१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात गंभीर रुग्णांची भर पडत असल्याने उपचाराला घेऊन आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

१९ मार्च रोजी विदर्भात रुग्णांची संख्या ५९७२, मृतांची संख्या ६० तर सक्रिय रुग्णांची संख्या ४८,०७० होती. २१ मार्च रोजी ती वाढून रुग्णसंख्या ६,७२७ झाली. मृतांची संख्या ५९ तर सक्रिय रुग्णांची संख्या ५३,८११वर पोहचली. २३ मार्च रोजी ६,२४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. ४८ रुग्णांचे जीव गेले. कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६,९०० झाली. २५ मार्च रोजी रुग्णसंख्या ६,७६२, मृतांची संख्या ७४ तर सक्रिय रुग्णांची संख्या ६१,४४४ झाली. दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर होत असल्याचे दिसून येत असताना २६ मार्च रोजी विदर्भात रुग्णसंख्येची विक्रमी नोंद झाली. ७,५९६ रुग्णांची नोंद झाली. शिवाय, ६९ रुग्णांचे मृत्यू तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४,६४१ वर गेली. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून येत आहेत. ३५०० ते ४००० नव्या रुग्णांची भर पडत आहे. नागपूरनंतर बुलडाण्यात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ८०० ते ९०० नवे रुग्ण दिसून येत आहेत. वाशिम जिल्ह्यात ४०० ते ५००, अकोल्यात ३५० ते ४५०, यवतमाळ जिल्ह्यात ४५० ते ५५०, अमरावती जिल्ह्यात २५० ते ३५०, वर्धा जिल्ह्यात २०० ते २५०, वर्धा व भंडारा जिल्ह्यात १५० ते २०० तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ५० ते ८० रुग्णांची नोंद होत आहे.

-विदर्भातील धक्कादायक स्थिती

१९ मार्च : ५,९७२ रुग्ण : ६० मृत्यू : ४८,०७० सक्रिय रुग्ण

२० मार्च : ६,६६६ रुग्ण : ४९ मृत्यू : ५०,९०८ सक्रिय रुग्ण

२१ मार्च : ६,७२७ रुग्ण : ५९ मृत्यू : ५३,८११ सक्रिय रुग्ण

२२ मार्च : ५,८५४ रुग्ण : ७४ मृत्यू : ५५,३४० सक्रिय रुग्ण

२३ मार्च : ६,२४४ रुग्ण : ४८ मृत्यू : ५६,९०० सक्रिय रुग्ण

२४ मार्च : ६,९७० रुग्ण : ६६ मृत्यू : ५९,६०७ सक्रिय रुग्ण

२५ मार्च : ६,७६२ रुग्ण : ७४ मृत्यू : ६१,४४४ सक्रिय रुग्ण

२६ मार्च : ७,५९६ रुग्ण : ६९ मृत्यू : ६४,६४१सक्रिय रुग्ण

Web Title: In Vidarbha, 52,791 patients, 499 deaths in seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.