विदर्भवाद्यांचा ठिय्या सुरूच, शीर्षासन करून वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:27+5:302021-08-14T04:11:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी, शुक्रवारी विदर्भ व त्यांनी ...

Vidarbha activists continue to sit, the attention is drawn by the head | विदर्भवाद्यांचा ठिय्या सुरूच, शीर्षासन करून वेधले लक्ष

विदर्भवाद्यांचा ठिय्या सुरूच, शीर्षासन करून वेधले लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी, शुक्रवारी विदर्भ व त्यांनी शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरातील प्रांगणात ठिय्या मांडला आणि आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान तीन कार्यकर्त्यांनी शीर्षासन करून लक्ष वेधले. दुपारनंतर झालेल्या नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीत १४ व १५ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली.

९ ऑगस्टपासून शहीद चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. विदर्भ राज्‍य आंदोलन समितीचे नेते ॲड. वामनराव चटप, राम नेवले, महिला आघाडी अध्‍यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्‍यक्ष मुकेश मासुरकर यांच्‍या नेतृत्‍वात पाचव्‍या दिवशी झालेल्या आंदोलनात नरेश निमजे या कार्यकर्त्‍याने २९ मिनिटे शीर्षासन केले. ऋषभ वानखेडे, सुदाम राठोड यांनीही शीर्षासन आंदोलन सहभाग नोंदवला.

आज वीज बिलाची जाहीर होळी

१४ ऑगस्टला वीज बिलाची होळी केली जाणार आहे.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनीही ठिय्या आंदोलन सुरुच राहणार आहे. विदर्भभरातील कार्यकर्त्यांनी या आंदोलनात नागपुरात उपस्थित राहावे, अशी हाक आयोजकांनी दिली आहे. विदर्भाच्या मागणीसाठी या दिवशी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ५ वाजता आंदोलनाचा पहिला टप्पा संपेल आणि त्यानंतर पुढील आंदोलनाची रुपरेषा निश्चित करण्यात येईल, असे राम नेवले यांनी सांगितले. आंदोलनस्थळी माधवराव गावंडे, गजानन अहमदाबादकर, उदयभान लांडगे, शैलेश धर्माधिकारी, ईश्वर सहारे, गौतम कामडे, सुनील तिवारी, पराग गुंडेवार, सुनील वडस्कर, प्रीती दीडमुठे, अशोक पटले व प्रशांत जयकुमार, जया चातुरकर, वीणा भोयर, रवींद्र भामोडे, प्रदीप सिरसकर, तरिश दुरुगकर, प्रशांत तागडे, सुदाम राठोड, डॉ. रमेश गजबे, गोविंदराव चिंतावार, निखिल भायणे यांचीही भाषणे झाली.

कार्यकर्त्यांच्या बैठकीतील ठराव

- विदर्भ राज्‍यासाठी शहीद झालेल्यांचे सामूहिक हुतात्‍मा स्‍मारक उभारणार.

-१४ ऑगस्‍टला वीज बिलांची होळी

-१५ ऑगस्‍टला संपूर्ण विदर्भातून आलेल्‍या कार्यकर्त्‍यांचे एक दिवसीय अन्‍नत्‍याग आंदोलन

- साप चावल्‍यामुळे मृत्‍युमुखी पडलेल्‍या शेतकऱ्यांच्‍या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या.

....

Web Title: Vidarbha activists continue to sit, the attention is drawn by the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.