महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांचे आंदोलन; फलकांवर झळकले 'विदर्भ' शासनाचे स्टीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 10:50 AM2022-05-02T10:50:56+5:302022-05-02T11:23:11+5:30
नागपुरातील अनेक शासकीय कार्यालयावर हे स्टीकर लावण्यात आले होते.
नागपूर : वेगळ्या विदर्भाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर लावून आहे. दरवर्षी विदर्भवाद्यांकडूनमहाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. कालही विदर्भातील अनेक ठिकाणी हा दिवस काळा दिवस पाळण्यात आला. तर, अनेक शासकीय फलकांवर महाराष्ट्र शासनाऐवजी विदर्भ शासन असे पोस्टर्स चिकटविण्यात आले होते.
महाराष्ट्राचा विकास होत असला तरी विदर्भाकडे राज्यकर्त्यांकडून नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विदर्भवाद्यांकडून केला जातो. त्याच अनुषंगाने विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी या प्रकारे शासकीय फलकांवर महाराष्ट्रऐवजी विदर्भ शासन स्टीकर चिकटवत निषेध नोंदवला.
नागपुरातील अनेक शासकीय फलकांवर विदर्भ राज्याचे स्टीकर लावण्यात आले.
याबाबतची माहिती मिळताच शासकीय यंत्रणेकडून हे फलक काढण्यात आल्याचेही दिसून आले. विदर्भवाद्यांच्या या कृतीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले.