विदर्भात आनंद जवादे ‘टॉप’
By admin | Published: May 30, 2017 04:54 PM2017-05-30T16:54:15+5:302017-05-30T16:54:15+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल २.७ टक्क्यांनी वाढला असला तरी राज्यातील स्थान मात्र घसरले आहे. यंदा विभागाची पाचव्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८९.०५ टक्के इतकी आहे. नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी आनंद जवादे याने ९८.१५ टक्के गुण प्राप्त करत विदर्भातून अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
विद्यार्थिनींनी मारली बाजी
विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ८५ हजार ६८० विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७८ हजार ७९५ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.१६ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८८.६१ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ७१ हजार ४८७ पैकी १ लाख ५२ हजार ७०४ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.
नियमित विद्यार्थ्यांची विभागीय आकडेवारी
अभ्यासक्रमपरीक्षार्थीउत्तीर्ण टक्केवारी
विज्ञान६९,०३३६६,३४४९६.१०
कला७०,८४९५८,३१३८२.३१
वाणिज्य२३,२३५२०,८८५८९.८९
एमसीव्हीसी८,३७०२०,८८५८५.५७
एकूण१,७१,४८७१,५२,७०४८९.०५
विभागात भंडारा जिल्हा ‘टॉप’
नागपूर विभागात यंदा भंडारा जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. भंडारा जिल्ह्यातून १९ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार २७ म्हणजेच ९२.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी वर्धा जिल्ह्याची आहे. तेथे १८ हजार ४६८ पैकी १५ हजार ७४७ म्हणजे ८५.२७ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्याचा निकाल ८९.५४ टक्के इतका लागला
जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
जिल्हानिकाल टक्केवारी
भंडारा ९२.९३ %
चंद्रपूर ८८.३२ %
नागपूर ८९.५४ %
वर्धा ८५.२७ %
गडचिरोली ८५.५७ %
गोंदिया ९०.४० %