विदर्भात मान्सूनची हुलकावणी ?
By Admin | Published: June 19, 2017 02:49 PM2017-06-19T14:49:27+5:302017-06-19T14:49:27+5:30
राज्यात मान्सूनच्या पावसाने प्रवेश केला आहे पण विदर्भात अद्याप दमदार आगमन झाले नसल्याने विदर्भाला मान्सूनचे याहीवर्षी हुलकावणी
> राजरत्न सिरसाट/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 19 - राज्यात मान्सूनच्या पावसाने प्रवेश केला आहे पण विदर्भात अद्याप दमदार आगमन झाले नसल्याने विदर्भाला मान्सूनचे याहीवर्षी हुलकावणी दिल्याची भावना शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. अनेक शेतकºयांनी पेरणी केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर नव्या वाणांचे प्रात्यक्षीत घेण्यात येत आहे पण पाऊसच नसल्याने पेरणी केलेल्या पिकांना तुषार सिंचनाव्दार ेजगविण्याचा केविलवाने प्रयत्न सुरू आहेत.मान्सूच्या पावसासाठी मात्र आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे नागपूर वेधशाळेचे संकेत आहेत.
राज्यात उशिरा मान्सूनचे आगमन झाले पण यावर्षी दमदार पावसाचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.पश्चिम महाराष्टÑ,मराठवाडा,कोकण विभागात पाऊस पडलाही परंतु विदर्भ अद्याप दमदार सार्वत्रिक पावसापासून वचिंत आहे. चांगल्या पावसाच्या संकेतामुळे विदर्भातील शेतकºयांनी यावर्षी कापूस पिकाचे नियोजन केले आहे. या पिकांंची पेरणीदेखील करण्यात येत आहे. भरपूर पाऊस लागणाºया या पिकांचे काही ठिकाणी अकंूरही निघाले आहे. आताच या पिकाला पाण्याची गरज आहे तसेच पेरणीसाठीदेखील दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
नागपूरच्या हवामानशास्त्र विभागाने १६ जून रोजी विदर्भात मान्सूनने प्रवेश केला असल्याची घोषणा केली आहे.त्यांच्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून मध्य महाराष्ट्रच्या काही भागांमध्ये पुढे गेला आहे, मराठवाडा, उर्वरित भाग, विदर्भ काही भाग, छत्तीसगढचा काही भाग, ओडिशातील बहुतेक भाग, पश्चिम बंगाल उर्वरित भागात पोहोचला आहे. झारखंड आणि बिहारचे काही भागात तो पोहोचायचा आहे. मान्सूनची उत्तर सीमा (एनएलएम) लॅटमधून उत्तीर्ण होते. २०.५ एन / लांब ६० अंश ई, लाट. २०.५ एन / लांब ७० ई, वलसाड, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ, कांचर, झारसुगुडा, जमशेदपूर, भागलपूर आणि लाट. २७.0 अंश एन / लांब ८६.० ई अंशात आहे. तसेच नैऋत्य मान्सूनच्या पुढील तीन ते चार दिवसांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगढ, झारखंड आणि बिहार आणि ओडिशातील उर्वरित भागांमध्ये अधिक अनुकूलतेसाठी अनुकूल परिस्थिती विकसित होत असल्याचे भाकीत वर्तविले होेते.
-मान्सूनसाठीचे हवामान अनुकूल असून, यवतमाळ, बुलडाणा या भागातानून मान्सूनचे वारे खालच्या दिशेने वाहत आहेत.येत्या तीन दिवसात विदर्भातील काही भागात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत आहेत.
ए.डी.थाटे,
संचालक,
हवामानशास्त्र विभाग,
नागपूूर.