विदर्भात  होळीच्या पर्वावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन : वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:07 PM2018-02-24T22:07:51+5:302018-02-24T22:08:22+5:30

भाजपाने निवडणुकीच्या वेळी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, नोटाबंदी व जीएसटीनंतर दोन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाले. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे होळीच्या पर्वावर १ मार्च रोजी विदर्भातील अकराही जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा समितीचे नेते माजी आ. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत केली.

In Vidarbha on eve of Holi festival 'Burning degree' movement: Vamanrao Chatap | विदर्भात  होळीच्या पर्वावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन : वामनराव चटप

विदर्भात  होळीच्या पर्वावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन : वामनराव चटप

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समिती : १६ व १७ एप्रिलला राष्ट्रीय अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :भाजपाने निवडणुकीच्या वेळी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, नोटाबंदी व जीएसटीनंतर दोन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाले. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे होळीच्या पर्वावर १ मार्च रोजी विदर्भातील अकराही जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा समितीचे नेते माजी आ. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत केली.
चटप म्हणाले, महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यातील १९ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. यापैकी २ लाख ५९ हजार पदे पाच वर्षात न भरल्यामुळे नेहमीसाठी निरस्त झाली आहेत. पगार द्यायला पैसे नाहीत म्हणून तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. आता तर पुन्हा ३० टक्के नोकरीची पदे कमी केली जाणार आहेत. सरकारचे असेच धोरण राहिले तर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी त्यांच्या डिग्रीचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बेरोजगार युवक रस्त्यावर उतरून डिग्रीची होळी करून दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल भाजपाला विचारणार आहेत.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन १६ व १७ एप्रिल रोजी नागपुरातील देशपांडे सभागृहात होणार आहे. या अधिवेशनात विदर्भाच्या लढ्याची दिशा निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच १ मे रोजी महाराष्ट्र दिनी नागपूरच्या विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

Web Title: In Vidarbha on eve of Holi festival 'Burning degree' movement: Vamanrao Chatap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.