विदर्भात नागपूरनंतर भंडाऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:51+5:302021-04-02T04:07:51+5:30

नागपूर : विदर्भात रुग्ण व मृत्यूच्या संख्येने गुरुवारी पुन्हा उच्चांक गाठला. ७,४७३ रुग्ण व ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ...

Vidarbha has the highest number of patients in Bhandara after Nagpur | विदर्भात नागपूरनंतर भंडाऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

विदर्भात नागपूरनंतर भंडाऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

googlenewsNext

नागपूर : विदर्भात रुग्ण व मृत्यूच्या संख्येने गुरुवारी पुन्हा उच्चांक गाठला. ७,४७३ रुग्ण व ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यानंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद भंडारा जिल्ह्यात झाली. नागपूर जिल्ह्यात ३,६३० रुग्ण व ६० मृत्यू झाले. भंडारा जिल्ह्यात ७३३ रुग्ण व एका रुग्णाचा जीव गेला. बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्येसोबतच मृत्यूसंख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. ७१० रुग्णांची भर पडली तर, ९ मृत्यू झाले. दरम्यानच्या काळात यवतमाळ जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत होते. परंतु आता पुन्हा दैनंदिन रुग्णसंख्या वाढून ६५४ झाली तर, ५ रुग्णांचे बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढून ३५३ झाली आहे, ३ मृत्यू झाले. वाशिम जिल्ह्यात ३२३ रुग्ण व १ मृत्यू, अमरावती जिल्ह्यात २८८ रुग्ण व ३ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात २८५ रुग्ण व ३ मृत्यू तर, अकोला जिल्ह्यात २५८ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली.

नागपूर : ३,६३० : ६०:

वाशिम : ३२३ : ०१

गोंदिया : १६७ : ००

अकोला : २५८ : ०५

बुलडाणा : ७१० : ०९

चंद्रपूर : ३५३ : ०३

गडचिरोली : ७२ : ००

वर्धा : २८५ : ०३

यवतमाळ : ६५४ : ०५

भंडारा : ७३३ : ०१

अमरावती : २८८ : ०३

Web Title: Vidarbha has the highest number of patients in Bhandara after Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.