इतिहासातही विदर्भाचा महाराष्ट्राशी संबंध दिसत नाही; ‘विदर्भनामा’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 08:32 PM2021-10-09T20:32:52+5:302021-10-09T20:33:26+5:30
Nagpur News इतिहासात डोकावल्यावर विदर्भाचा पुणे-मुंबईशी कोणताच संबंध आढळून येत नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्रीहरी अणे यांनी केले.
नागपूर : इतिहासात डोकावल्यावर विदर्भाचा पुणे-मुंबईशी कोणताच संबंध आढळून येत नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्रीहरी अणे यांनी केले.
विदर्भ मिरर प्रकाशन व पत्रकार क्लबच्यावतीने प्रेस क्लबमध्ये ॲड. श्रीहरी अणे यांच्या ‘विदर्भ नामा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. वामनराव चटप होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, डॉ. हेमंत साने, प्रभाकर कोंडबत्तुनवार, अजय पांडे, राजेश कुंभारे उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनादरम्यान विदर्भाचे आश्वासन देणारे सरकार सत्तेवर येऊनही काहीच उपयोग झाला नाही. मराठी भाषिकांचे दोन पक्ष असू शकतात तर दोन राज्ये का नाहीत, असा सवाल यावेळी माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी अध्यक्षस्थानावरून उपस्थित केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश सिंगलकर यांनी केले तर संचालन वैदेही चवरे-सोईतकर यांनी केले. आभार डॉ. रवींद्र भुसारी यांनी मानले.
..........