विदर्भात दडलाय मौल्यवान धातूंचा खजिना; वैरागडचे हिरे, भिवापूरचे सोने, कुहीचे टंगस्टन जमिनीतून काढणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 12:27 PM2022-11-09T12:27:08+5:302022-11-09T12:27:58+5:30
भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षणातून दिले होते संकेत
निशांत वानखेडे
नागपूर : भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (जीएसआय)च्या सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर परिसरात सोन्याचे साठे, कुही तालुक्यात 'टंगस्टन' तर गडचिरोलीच्या वैरागड परिसरात हिन्याची खाण असण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर विदर्भात वेगवेगळ्या भागात सोने, कोबाल्ट, निकेल, शिसे अशा मौल्यवान धातूंचा खजिना दडलेला आहे. हा खजिना राज्याच्या संपत्तीत भर घालू शकतो. त्यामुळे जीएसआयच्या या अहवालांवर काम कधी सुरू होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोळसा, मॅगनीज व काळा दगड या खनिज संपदेसाठी विदर्भ देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र, मुबलक वनसंपदेने नटलेल्या विदर्भाच्या भूगर्भात सोने, निकेल, 5. कोबाल्टसारख्या मौल्यवान धातूंचा खजिनाही दडलेला आहे. जीएसआयच्या भूवैज्ञानिकांनी - वेगवेगळ्या भागात - केलेल्या सर्वेक्षणातून याबाबतचे संकेत दिले आहेत.
जीएसआयच्या वैज्ञानिकांनी याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता. देशात बस्तर खोरे मौल्यवान खनिज संपदेसाठी प्रसिद्ध आहे. भूवैज्ञानिकांच्या मते काही दशलक्ष वर्षापूर्वी भूगर्भात बस्तर क्रेटॉन व बुंदेलखंड क्रेटॉन यांच्यात वारंवार धडक झाल्या आहेत. त्यामुळे भूगर्भातील खनीज संपदा वर आली असावी, असे संकेत मिळतात. विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोलीचा भाग हा बस्तर खोऱ्यात येतो. या भागात मोठ्या प्रमाणात सोने असण्याची शक्यता मिळाली होती. मात्र, वनक्षेत्राचा प्रदेश असल्याने पुढे त्यावर संशोधन होऊ शकले नाही.
गडचिरोलीच्या सुरजागड परिसरात लोहखनीजच्या खाणी आहेत. जीएसआयच्या अहवालानुसार या परिसरात ११८.४५ मेट्रिक टन लोहखनीज असू शकते. आयर्न ओरचे साठे सिंधुदुर्ग परिसरातही आहेत. या भागात २५०.२ मेट्रिक टन लोहखनीज असण्याची शक्यता आहे. जीएसआयच्या या सर्वेक्षणाचा अहवाल काही वर्षांपूर्वी राज्य व केंद्र सरकारकडे सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यावर पुढे काही कारवाई झाली नाही.
या आहेत महत्त्वाच्या नोंदी
- नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यात टंगस्टनचा साठा आहे. जवळपास ८.७५ दशलक्ष टन ढंगस्टन असण्याची शक्यता आहे. विजेचा दिवा प्रकाशित करणारी तार या धातूने बनलेली असते.
- भिवापूर परिसरात, सोन्याचे साठे आहेत पण ते प्रमाण अत्यल्प आहे.
- नागपूरच्याच रानमांगली, कोलार, भोंडरी या भागात शिसे आणि झिक धातूचे साठे असल्याची नोंद आहे.
- वैरागड, जिल्हा गडचिरोली येथे हिचाची खाण असण्याचे संकेत आहेत.
- भंडाराच्या आसपास कायनेट धातूचा साठा ३४ हजार ९८८ टन असण्याची शक्यता आहे.
- साकोली भागात निकेल, कोबाल्ट, क्रोमाईट आणि प्लॅटिनम गटातील धातूच्या खाणी असल्याच्या नोंदी आहेत.
हवामान बदलावरही संशोधन
हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी जीएसआयचे कार्य सुरू आहे. मात्र, बहुतांश काम आसाम, सिक्कीम, गुवाहाटी, मेघालय, शिलाँग या पूर्वोत्तर राज्यात सुरू आहे. या भागातील नमुने गोळा करण्यात येत असून त्यावर फरिदाबाद येथील प्रयोगशाळेत संशोधन सुरू आहे.
- सी. एच. चव्हाण, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जीएसआय