विदर्भातील दूध उत्पादन वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:44 AM2017-10-13T01:44:34+5:302017-10-13T01:44:58+5:30

विदर्भातील दुधाच्या उत्पादन वाढीसाठी तसेच पशुधन संगोपनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सकस वैरण क्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे.

Vidarbha milk production will increase | विदर्भातील दूध उत्पादन वाढणार

विदर्भातील दूध उत्पादन वाढणार

Next
ठळक मुद्देअनुप कुमार : चारायुक्त शिवार अभियानाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील दुधाच्या उत्पादन वाढीसाठी तसेच पशुधन संगोपनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सकस वैरण क्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. विविध प्रकारच्या चाºयाच्या जातीचे संगोपन व संवर्धन केल्यास उपलब्ध असलेल्या पशुधनाला पुरेल एवढा चारा निर्माण करण्यासोबतच दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी चारायुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा माफसुचे कुलगुरु अनुप कुमार यांनी केल्या.
जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात पशुसंवर्धन विभागातर्फे चारायुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मनरेगा उपायुक्त पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, एनडीडीबीचे प्रकल्प संचालक डॉ. सतीश राजू, डॉ. सुधीर कविटकर, डॉ. प्रवीण भालेराव, डॉ. उमेश हिरुळकर, डॉ. अनिरुद्ध पाठक आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले, पारंपरिक चाºयांच्या प्रजातीसह हिरवा चारा सायलेजद्वारा उपलब्ध करणे तसेच आजोलासारख्या चाºयाच्या प्रजातींना प्रोत्साहन दिल्यास दूध उत्पादन वाढवू शकते. शेतकºयांनी चारा उत्पादनाला प्राधान्य द्यावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत प्रोत्साहन आहे.
दूध उत्पादन वाढविण्यासाठी चारायुक्त शिवार अभियान असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले. रोहयोचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
संचालन तांत्रिक अधिकारी डॉ. दीपक कडू यांनी केले. अंकुश केदार यांनी आभार मानले.
एक एकरात दररोज २५० किलो वैरण
एनडीडीबीचे प्रकल्प संचालक डॉ. सतीश राजू म्हणाले, एक एकरात दरारोज २५० किलो वैरण उत्पादन होऊ शकते. जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जनावरांचे पोषण योग्य रीतीने करणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना हिरवा चारा, वाळला चारा आणि खुराक यांचा सकस व समतोल आहार दिल्याने उत्पादन क्षमता उच्च पातळीवर टिकवणे शक्य होते.
संकल्पना शेतकºयांपर्यंत पोहचावी
डॉ. सुधीर कविटकर यांनी चारा युक्त शिवाराला ही संकल्पात प्रत्येक शेतकºयांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. येणाºया काळात शेतकºयांच्या विकासाकरिता चारायुक्त शिवार अभियान वरदान ठरणार आहे. विदर्भात अभियानाला गती मिळाल्यास शेतकरी दुग्ध व्यवसायात प्रगती करू शकेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Vidarbha milk production will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.