विदर्भात नागपूर सर्वात ‘थंड’ : पारा @ ५.४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:09 PM2019-01-01T23:09:25+5:302019-01-01T23:12:03+5:30
नववर्षाच्या पहिली दिवशी उन्हामुळे लोकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला. पण रात्री थंडीचा प्रकोप सुरूच आहे. मंगळवारी किमान तापमान ५.४ डिग्री सेल्सिअस होते. ते सामान्यांपेक्षा ८ डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळे लोकांना थंडीचा प्रभाव जाणवत आहे. तसेच संपूर्ण विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड राहिले. नागपूरसह विदर्भातील अन्य जिल्ह्यातही तापमान वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नववर्षाच्या पहिली दिवशी उन्हामुळे लोकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला. पण रात्री थंडीचा प्रकोप सुरूच आहे. मंगळवारी किमान तापमान ५.४ डिग्री सेल्सिअस होते. ते सामान्यांपेक्षा ८ डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळे लोकांना थंडीचा प्रभाव जाणवत आहे. तसेच संपूर्ण विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड राहिले. नागपूरसह विदर्भातील अन्य जिल्ह्यातही तापमान वाढत आहे.
हवामान खात्यानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची गती कमी झाल्यामुळे दिवसा थंडीपासून दिलासा मिळाला आहे. पण वातावरण शुष्क असल्यामुळे रात्री तापमान सामान्यापेक्षा कमी आहे. किमान तापमान सामान्य स्तरावर येणार नाही, तोपर्यंत लोकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही. पुढील दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
आकाश नीरभ्र असल्यामुळे नागपुरात सकाळी ऊन्ह होते. गेल्या २४ तासात तापमानात २.७ डिग्री वाढ झाल्यामुळे कमाल तापमानात ३० डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात पाचपटीपेक्षा जास्त अंतर असल्यामुळे लोकांना थंडीचा तडाखा बसत आहे. सूर्यास्तानंतर शहरात थंडीचा तडाखा जास्त प्रमाणात आहे.
विदर्भात पुन्हा एकदा बुलडाणा येथे किमान तापमान १०.८ आणि वर्धा येथे १० डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर ब्रह्मपुरी ६.६, गोंदिया ६.७, चंद्रपूर ६.८, अकोला-गडचिरोली ७.२, वाशीम ९.२, यवतमाळ ९.४ आणि अमरावती येथे ९.६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.