फैज फझलकडे विदर्भ रणजी संघाचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 10:31 AM2019-12-05T10:31:47+5:302019-12-05T10:32:29+5:30
अनुभवी डावखुरा फलंदाज फैज फझल हा आगामी रणजी सत्रात पुन्हा एकदा राष्टÑीय विजेत्या विदर्भ संघाचे नेतृत्व करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुभवी डावखुरा फलंदाज फैज फझल हा आगामी रणजी सत्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय विजेत्या विदर्भ संघाचे नेतृत्व करणार आहे.
विदर्भाने दोन्हीवेळा रणजी आणि इराणी करंडकाचे विजेतेपद फैजच्या नेतृत्वात पटकवले, हे विशेष. गतविजेत्या संघातील अनेक चेहरे यंदा संघात कायम आहेत.
यंदा विदर्भााल एलिट अ गटात स्थान मिळाले असून, पहिली लढत आंध्र प्रदेशविरुद्ध ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत मुलापाडू येथे होईल. विदर्भ संघ ६ डिसेंबर रोजी सामनास्थळी रवाना होईल, असे व्हीसीएतर्फे कळविण्यात आले आहे.
दरम्यान कर्नल सी. के. नायडू करंडक अंडर २३ लढतीसाठीदेखील विदर्भ संघ जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेश संघाविरुद्ध हा सामना व्हीसीएच्या कळमना मैदानावर ११ ते १४ डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. याशिवाय कूचबिहार करंडक स्पर्धेसाठी अंडर १९ संघाचीदेखील घोषणा करण्यात आली.
विदर्भ संघ ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत सिव्हिल लाईन्सस्थित मैदानावर कर्नाटकविरुद्ध सामना खेळेल. त्यानंतर १३ ते १६ डिसेंबर दरम्यान गुजरातविरुद्ध नडियाड येथे विदर्भाला सामना खेळायचा आहे.
विदर्भ रणजी संघ : फैज फझल कर्णधार, अक्षय कोलार, वसीम जाफर, गणेश सतीश, मोहित काळे, अक्षय वाडकर, आदित्य सरवटे, अक्षय वखरे, रजनीश गुरबानी, ललित यादव, यश ठाकूर, सुनिकेत बिंगेवार, जितेश शर्मा, अक्षय कर्णेवार आणि आर. संजय.
अंडर २३ संघ : अथर्व तायडे कर्णधार, सिद्धेश वाठ, पवन परनाते, नयन चव्हाण, अनिरुद्ध चौधरी, यश राठोड, सौरभ ठुब्रीकर, यश कदम, मोहित राऊत, दर्शन नळकांडे, पार्थ रेखडे, आदित्य ठाकरे, सौरभ दुबे, नचिकेत भुते, गौरव ढोबळे.
अंडर १९ संघ : अमन मोखाडे कर्णधार, हर्ष दुबे उपकर्णधार, मोहम्मद फैज, रोहित बिनकर, दानिश मालेवार, संदेश दुरुगवार, प्रेरित अग्रवाल, मनदार महाले, मनन दोशी, प्रफुल्ल हिंगे, रोहित दत्तात्रय, आवेश शेख, गणेश भोसले, अनिकेत पांडे आणि सुश्रुत बैस्वार.