विदर्भातील पर्जन्यमानात १४ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:17+5:302021-09-06T04:12:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अन्य विभागांच्या तुलनेत यंदा विदर्भातील पर्जन्यमानामध्ये १४ टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर महिना उजाडला ...

Vidarbha receives 14% less rainfall | विदर्भातील पर्जन्यमानात १४ टक्क्यांनी घट

विदर्भातील पर्जन्यमानात १४ टक्क्यांनी घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अन्य विभागांच्या तुलनेत यंदा विदर्भातील पर्जन्यमानामध्ये १४ टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर महिना उजाडला तरी पाऊस मेहरबान नाही. विदर्भातील अनेक प्रकल्पही अद्याप भरलेले नाहीत. वातावरणातील दमटपणामुळे पिकांवर कीड वाढली असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकल्यासारखी स्थिती आहे.

विदर्भातील नागपूर आणि अमरावती या दोन्ही विभागात पावसाची स्थिती वाईट आहे. नागपूर विभागात आतापर्यंत ८६.३ टक्के पाऊस पडला असून अमरावती विभागातील पावसाची टक्केवारी १००.४ आहे. जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही विभागात पावसाची टक्केवारी वाढलेली दिसत असली तरी प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यात पावसाने बरीच ओढ दिली आहे. टक्केवारी अधिक दिसत असूनही ऑगस्टमध्ये शेतीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. या उलट जून आणि जुलै महिन्यातील अतिरिक्त पावसाने संत्रा व मोसंबी पिकांचे नुकसानच अधिक झाले आहे. आता नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदारांना फळगळीच्या समस्येने ग्रासले आहे.

...

विदर्भातील पाऊस (टक्के)

जिल्हा - जून - जुलै - ऑगस्ट

वर्धा - १४३.३ - ९५.३ - ५७.४

नागपूर - १२०.८ - १०१.९ - ५८.९

भंडारा - १३८.७ - ८९.३ - ५०.५

गोंदिया - १०८.८ - ८७.७ - ५३.०

चंद्रपूर - १६७.१ - १३३.८ - ५१.७

गडचिरोली - ८९.३ - ९८.९ - ५९.६

बुलडाणा - १३१.० - ९८.५ - ६६.८

अकोला - ६९.६ - १३७.५ - ६१.९

वाशिम - १४३.९ - १२१.७ - ६८.९

अमरावती - १४६.७ - ७७.० - ४५.८

यवतमाळ - १७०.८ - १०७.३ - ८८.६

...

नैसर्गिक आपत्ती आणि किडीने शेतकरी वैतागला

- विदर्भातील शेतकऱ्यांपुढे जेवढे पावसाचे संकट आहे, तेवढेच पिकांवरील किडीचेही आहे. कापसावर गुलाबी बोंड अळीने थैमान घातले आहे. मावा, तुडतुडेही पीक फस्त करीत आहेत. सोयाबीनवर खोडअळींचे आक्रमण मागील महिन्यात होते. आता खोडमाशीसोबत उंटअळी, चक्रीभुंगाही आला आहे. धान पिकांवर पिवळ्या खोडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जून आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे संत्रा बागेतील फळगळ ३० ते ४० टक्क्यांवर असल्याने या नगदी पिकावर संक्रात आली आहे.

- जून, जुलै महिन्यातील अतिवृष्टीने अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील काही तालुक्यात पिकांचे नुकसान आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील पिकांचे नुुकसान झाले आहे. दोन्ही विभागात पंचनाम्याची कामे सुरू आहेत.

...

प्रकल्पातील पाणीसाठा (टक्के)

विभाग - मोठे प्रकल्प - मध्यम प्रकल्प - लघु प्रकल्प

अमरावती - (१०) ८२.८९ - (२५) ६२.४४ - (४११) २४.६२

नागपूर - (१६) ५९.५ - (४२) ३२.८६ - (३२६) २०.१५

...

Web Title: Vidarbha receives 14% less rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.