विदर्भात दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:53+5:302021-04-06T04:07:53+5:30

नागपूर : विदर्भात वाढत असलेल्या मृत्यूने कोरोनाचे संकट आणखी गडद झाले आहे. सोमवारी ९९ मृत्यू व ६,४४३ रुग्णांची नोंद ...

Vidarbha recorded the highest number of deaths in the second wave | विदर्भात दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

विदर्भात दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

googlenewsNext

नागपूर : विदर्भात वाढत असलेल्या मृत्यूने कोरोनाचे संकट आणखी गडद झाले आहे. सोमवारी ९९ मृत्यू व ६,४४३ रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले. ५७ मृत्यू व ६,३०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यातही मागील काही दिवसापासून मृत्यूची संख्या वाढली आहे. आज १० रुग्णांचे जीव गेले तर ३०१ रुग्ण आढळून आले. भंडारा जिल्ह्यात ९ मृत्यू व ६५६ रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात ५ मृत्यू व २६५ रुग्ण, अकोला जिल्ह्यात ४ मृत्यू व २०३ रुग्ण, गडचिरोली जिल्ह्यात ३ मृत्यू ७३ रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात २ मृत्यू व २५५ रुग्ण तर, वाशिम जिल्ह्यात २ मृत्यू व १६० रुग्णांची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात आज शून्य मृत्यूची नोंद होती. ३०१ बाधित रुग्ण आढळून आले.

नागपूर : ३,५१९ : ५७

गडचिरोली : ७३ : ०३

चंद्रपूर : २६५ : ०५

भंडारा : ६५६ : ०९

गोंदिया : २५५ : ०२

वर्धा : १३६ : ०२

अमरावती : २४१ : ००

यवतमाळ : ३०१ :१०

बुलडाणा : ६३४ : ०५

अकोला : २०३ : ०४

वाशिम : १६० :०२

Web Title: Vidarbha recorded the highest number of deaths in the second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.