विदर्भ साहित्य संघाने समाजमनावर संस्कार केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2023 10:13 PM2023-01-14T22:13:43+5:302023-01-14T22:14:22+5:30

Nagpur News समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना जोडणाऱ्या वि. सा. संघाने विदर्भातील सामाजिक मनावर संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

Vidarbha Sahitya Sangh inculcated community spirit | विदर्भ साहित्य संघाने समाजमनावर संस्कार केले

विदर्भ साहित्य संघाने समाजमनावर संस्कार केले

Next
ठळक मुद्देडॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना ‘जीवनव्रती’ पुरस्कार प्रदान

 

नागपूर : विदर्भ साहित्य संघाने शंभर वर्षांच्या आपल्या इतिहासात विदर्भाच्या कानाकोपऱ्यात क्रियाशीलपणे कार्य केले. मराठी प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, नवोदितांच्या सहकार्याने विदर्भाचे साहित्य विश्व जिवंत केले. समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना जोडणाऱ्या वि. सा. संघाने विदर्भातील सामाजिक मनावर संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

विदर्भ साहित्य संघाच्या यंदाच्या शतक महोत्सवी वर्षातील वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवारी सांस्कृतिक संकुलातील रंगशारदा सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. मंचावर ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, शताब्दी महोत्सवाचे संयोजक गिरीश गांधी, डॉ. पिनाक दंदे, आशुतोष शेवाळकर, संस्थेचे विश्वस्तद्वय न्या. विकास सिरपूरकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर, डॉ. रमाकांत कोलते यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमात नितीन गडकरी व प्रदीप दाते यांच्या हस्ते झाडीबोलीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना ‘जीवनव्रती’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र डोळके यांनी तर, संचालन प्रा. विवेक अलोणी व वृषाली देशपांडे यांनी केले. डॉ. गजानन नारे यांनी आभार मानले. यावेळी इतरही वाङ्मयीन पुरस्कारांचेदेखील वितरण करण्यात आले.

-वि.सा. संघाने नवप्रवाहांना सामावून घ्यावे- महेश एलकुंचवार

मागील साठ वर्षांत अनेक नवे साहित्य प्रवाह उदयास आले असून त्या सर्वांना सामावून घेण्याचा विदर्भ साहित्य संघाने प्रयत्न केला पाहिजे आणि साहित्य चळवळीला सशक्त केले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केली.

-वाङ्मयीन पुरस्कार विजेते -

देवेंद्र पुनसे, विशाल मोहोड, डॉ. राजेंद्र रंगराव राऊत, किरण शिवहरी डोंगरदिवे, अशोक पळवेकर, एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर, वर्षा ढोके व डॉ. माधवी जुमडे.

-नवोदित साहित्य लेखन पुरस्कार

नितीन करमरकर यांचा ‘समर्पण’ हा कथासंग्रह व मेघराज मेश्राम यांचा ‘माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवितासंग्रह.

-राज्यस्तरीय पुरस्कार

:पु.भा.भावे स्मृती पुरस्कार - महेश खरात

:श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार - पी. विठ्ठल

: डॉ.आशा सावदेकर स्मृती पुरस्कार - डॉ.सुरेश सावंत

-शताब्दी वर्ष विशेष पुरस्कार

:‘गावकारागीरांचे शब्द-जीवनचित्र’: सीमा रोठे शेट्ये

: बाङला मराठी शब्दकोश : मंदिरा गांगुली, मीनल जोशी, प्रमोदिनी तापास आणि डॉ. वीणा गानू

:राजन लाखे संपादित‘ बकुळगंध’

: प्रशांत पनवेलकर यांच्या ‘नवा पेटता काकडा’

:डॉ. नितीन रिंढे यांना कविवर्य ग्रेस स्मृती पुरस्कार

: प्रणव सखदेव यांना : शांताराम कथा पुरस्कार

-उत्कृष्ट शाखा पुरस्कार

: चंद्रपूर शाखा

‘लोकमत’चे प्रवीण खापरे, मेघराज मेश्राम यांना पुरस्कार

:‘लोकमत’चे उपसंपादक प्रवीण खापरे यांना हरिकिशन अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार तर मेघराज मेश्राम यांच्या ‘माणूस असण्याच्या नोंदी’ कवितासंग्रहाला नवोदित लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Vidarbha Sahitya Sangh inculcated community spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.