विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर; १४ जानेवारीला होईल समारोह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 08:10 PM2023-12-28T20:10:36+5:302023-12-28T20:13:59+5:30

येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना हे वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

Vidarbha Sahitya Sangh State Level Literary Award Announced; The ceremony will be held on January 14 | विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर; १४ जानेवारीला होईल समारोह

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर; १४ जानेवारीला होईल समारोह

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना हे वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

यंदा राज्यस्तरीय विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार स्मिता लिमये यांच्या ‘चर्नोबिलची प्रार्थना’ या पुस्तकाला प्राप्त झाला आहे. राज्यस्तरीय आशा सावदेकर स्मृती साहित्य समीक्षा पुरस्कार ‘राजारामशास्त्री भागवत यांचा भाषाविचार’ या मनीषा खैरे यांच्या ग्रंथाला बहाल करण्यात येणार आहे तर राज्यस्तरीय कविवर्य श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार ‘शतकोत्तरी ओरखडा’या राजीव जोशी यांच्या ग्रंथाला प्राप्त झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक पु. य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार नरेंद्र शेलार यांच्या ‘महाकारुणिक’ कादंबरीला, अण्णासाहेब खापर्डे स्मृती आत्मकथन पुरस्कार ‘मी पॉझिटीव्ह आलो’ या प्रमोद नारायणे यांच्या आत्मकथनाला, कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार डॉ. मिलिंद चोपकर यांच्या ‘मराठी वनसाहित्य : आस्वादाची अक्षरे’ या ग्रंथाला तर शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती कविता लेखन पुरस्कार बबन सराडकर यांच्या ‘आवर सावर’ या कवितासंग्रहला प्राप्त झाला आहे. वा. कृ. चोरघडे स्मृती कथा लेखन पुरस्कार डॉ. रमा गोळवलकर यांच्या ‘खुर्जरवाहिका’ ला तर य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार मिलिंद कीर्ती यांच्या ‘तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता - कृत्रिम बुद्धीमत्तेचे मायाजाल युग’ ला प्राप्त झाला आहे. संत गाडगेबाबा स्मृती प्रवासवर्णन लेखन पुरस्कार ‘अगं नर्मदे’ या संजय वासुदेव कठाळे यांच्या ग्रंथाला, वा. ना. देशपांडे स्मृती ललित लेखन पुरस्कार प्रफुल्ल उदयन सावरकर यांच्या ‘निसर्ग संवाद-अनुभव जंगलातले’ या ग्रंथाला देण्यात येणार आहे.

मा. गो. देशमुख स्मृती संत साहित्य लेखन पुरस्कार डॉ. गिरीश सपाटे यांच्या ‘भागवत धर्मातील अलक्षित संत कवी’ व डॉ. माया पराते-रंभाळे यांच्या ‘संत कवयित्रींची भावकविता’ यांना विभागून देण्यात येणार आहे. नाना जोग स्मृती नाट्यलेखन पुरस्कार प्रमोद भुसारी यांच्या ‘भोवरा’ व आनंद भीमटे यांच्या ‘गद्दार’ या नाट्यकृतींना विभागून देण्यात आला आहे. बा. रा. मोडक स्मृती बालसाहित्य लेखन पुरस्कार शंकर क-हाडे यांच्या ‘अब्राहम लिंकन’ या साहित्यकृतीला, डॉ. वा. वि. मिराशी स्मृती वैचारिक वाडमय पुरस्कार ‘महासत्तेच्या स्पर्धेत चीन’ या प्रमोद वडनेरकर यांच्या ग्रंथाला तर के.ज. पुरोहित पुरस्कृत ‘शांताराम’ कथा पुरस्कार ‘बकुळ डंख (अक्षरलिपी दिवाळी अंक २०२३)’ या डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांच्या कथेला, कविवर्य ग्रेस ‘युगवाणी’तील सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचा पुरस्कार दिनकर बेडेकर यांच्या ‘जी. एं. च्या कथेतील रंगभान आणि दृष्टभान’ या लेखाला प्राप्त झाला आहे.

वैभव भिवरकर यांच्या ‘करुणेचे कॉपीराईट्स’ व पल्लवी पंडित यांच्या ‘सफरनामा – निवडक कलाकारांचा’ या साहित्याकृतींना नवाेदित लेखनाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्व. हरिकिशन अग्रवाल स्मृती पुरकार सकाळ दैनिकाचे पत्रकार केतन पळस्कर यांना प्रदान केला जाणार आहे.

विदर्भ साहित्य संघाचा शतकोत्तर विशेष पुरस्कार ‘योगोपचार’ या योगगुरू राम खांडवे व डॉ. अनिरूद्ध गुर्जलवार यांच्या ग्रंथाला प्राप्त झाला आहे असून राजन लाखे पुरस्कृत सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार यंदा विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेला प्रदान करण्यात येणार आहे.
 

Web Title: Vidarbha Sahitya Sangh State Level Literary Award Announced; The ceremony will be held on January 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.