विदर्भाला मिळणार १०० ॲम्ब्युलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:51+5:302021-05-16T04:08:51+5:30
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वाहन निर्माता कंपनी एमजी मोटरने विदर्भाला १०० ॲम्ब्युलन्स देण्याचा ...
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वाहन निर्माता कंपनी एमजी मोटरने विदर्भाला १०० ॲम्ब्युलन्स देण्याचा निर्णय घेतला. यापैकी आठ ॲम्ब्युलन्स नागपूरला पोहोचवण्यात आल्या आहेत. कंपनीतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भाला अत्याधुनिक जीवनरक्षक यंत्रणांनी सज्ज १०० ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. कंपनीचे अध्यक्ष राजीव छाबा यांनी सांगितले की, गडकरी यांची विनंती मान्य करीत कंपनीने ॲम्ब्युलन्स प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. ८ ॲम्ब्युलन्स तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कंपनीने यापूर्वी नागपुरातील नांगिया स्पेशालिटी रुग्णालयाला ५ रेट्रोफिटेड हेक्टर ॲम्ब्युलन्स प्रदान केल्या आहेत. या ॲम्ब्युलन्समुळे रुग्णांना रुग्णलयापर्यंत पोहोचण्याची समस्या कमी होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.