नागपूरसह विदर्भाची ‘भाजणी’ : झळांनी होरपळली जनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:07 PM2019-05-28T23:07:12+5:302019-05-28T23:08:15+5:30
मंगळवारचा दिवस हा विदर्भवासीयांची परीक्षा घेणाराच ठरला. चंद्रपुरात ४७.८ अंश सेल्सिअस तर नागपुरात ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले. नवतप्याचा ताप असाच सुरू राहिला तर यंदा सर्वोच्च तापमानाचा ‘रेकॉर्ड’ मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारचा दिवस हा विदर्भवासीयांची परीक्षा घेणाराच ठरला. चंद्रपुरात ४७.८ अंश सेल्सिअस तर नागपुरात ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. या मोसमातील हे सर्वाधिक तापमान ठरले. नवतप्याचा ताप असाच सुरू राहिला तर यंदा सर्वोच्च तापमानाचा ‘रेकॉर्ड’ मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.
मंगळवारी नागपूरसह इतर शहरांत ४७ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान जाईल, असा अंदाज हवामान खात्याने अगोदरपासूनच वर्तविला होता. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणातील दाहकता जाणवायला लागली होती. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत तर उष्ण वाऱ्यांमुळे अक्षरश: भाजणीच होत होती. नागपुरात कमाल ४७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ३.७ अंश सेल्सिअसहून अधिक तर होतेच. शिवाय २४ तासात पाºयामध्ये ०.८ अंश सेल्सिअसची वाढ झाली. किमान ३२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
विदर्भात पारा ४५ वरच
विदर्भात जवळपास सर्वच मुख्य ठिकाणी पारा ४५ अंशांहून अधिक होता. ब्रम्हपुरी येथे ४६.९ अंश सेल्सिअस तर वर्धा येथे ४६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. गडचिरोलीत पारा ४६ अंशांवर गेला होता.
आणखी वाढू शकते तापमान
हवामान खात्याने अगोदरच विदर्भात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपुरात आणखी दोन दिवस तापमान ४७ अंशांहून अधिक राहण्याची शक्यता आहे. नागपुरात २३ मे २०१३ रोजी ४७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. यंदा हा रेकॉर्ड मोडीत निघण्याची शक्यता आहे.
तारीख तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२२ मे ४६.०
२३ मे ४६.२
२४ मे ४६.०
२५ मे ४६.३
२६ मे ४६.५
२७ मे ४६.७
२८ मे ४७.५
विदर्भातील तापमान
केंद्र कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
नागपूर ४७.५
ब्रम्हपुरी ४६.९
वर्धा ४६.५
चंद्रपूर ४७.८
गडचिरोली ४६.०
अकोला ४५.६
अमरावती ४५.८
यवतमाळ ४५.०
गोंदिया ४५.५
मे महिन्यातील सर्वाधिक तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
तारीख तापमान
२३ मे २०१३ ४७.९
२३ मे २००५ ४७.६
२८ मे २०१९ ४७.५
२ मे २००९ ४७.४
२५ मे २०१० ४७.३