विदर्भाचे चार कवी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 08:51 PM2019-05-16T20:51:06+5:302019-05-16T20:54:05+5:30
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विषयातील बी.ए. अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात नागपूरचे लोकनाथ यशवंत यांच्यासह विदर्भातील चार कवींच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विषयातील बी.ए. अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात नागपूरचे लोकनाथ यशवंत यांच्यासह विदर्भातील चार कवींच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. लोकनाथ यांच्या ‘आता होऊन जाऊ द्या’ या काव्यसंग्रहातील ‘नफिसा’ ही कविता समाविष्ट करण्यात आली. याशिवाय वाशिमचे शेषराव पिराजी धांडे यांच्या ‘रस्ता सोडून चालला कुठे?’ या काव्यसंग्रहातील ‘बेसावध’ ही कविता, मोहन सिरसाट यांच्या ‘नाही फिरलो माघारी’ काव्यसंग्रहातील ‘नाही फिरलो माघारी’ ही कविता तर सुनील अभिमान अवचार यांच्या ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ’ या काव्यसंग्रहातील ‘तृष्णेच्या कविता’ या दीर्घ कवितेचा समावेश आहे. जून २०१९ ते २०२४ पर्यंतच्या सत्रातील अभ्यासक्रमात या कविता शिकविल्या जाणार आहेत.