इंडोनेशियाच्या गिनीज विक्रमात वैदर्भीय स्नेहलचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 03:14 PM2018-08-10T15:14:14+5:302018-08-10T15:14:40+5:30

जकार्ता येथे १८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आशियाड क्रीडा स्पर्धांचे स्वागत करण्यासाठी इंडोनेशियाने रस्त्यावरील समूह नृत्याचा विश्वविक्रम नोंदविला आणि त्यात हातभार लागला विदर्भकन्या स्नेहल देशपांडे-धानोरकर यांचा !

Vidarbha's Snehal's participation in the Guinness record of Indonesia | इंडोनेशियाच्या गिनीज विक्रमात वैदर्भीय स्नेहलचा सहभाग

इंडोनेशियाच्या गिनीज विक्रमात वैदर्भीय स्नेहलचा सहभाग

Next
ठळक मुद्देनृत्यपथकात सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जकार्ता येथे १८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आशियाड क्रीडा स्पर्धांचे स्वागत करण्यासाठी इंडोनेशियाने रस्त्यावरील समूह नृत्याचा विश्वविक्रम नोंदविला आणि त्यात हातभार लागला विदर्भकन्या स्नेहल देशपांडे-धानोरकर यांचा !
गेल्या रविवारी मध्य जकार्ताच्या विस्तीर्ण रस्त्यावर पार पडलेल्या या गिनीज बुक विक्रमात ६५ हजार स्त्री-पुरुष नर्तक सहभागी झाले होते. त्यात जकार्तामधील सर्वभाषिक भारतीयांचे ५० जणांचे पथक होते.
यात सहभागी असलेल्या स्नेहल देशपांडे मूळच्या चंद्रपूरकर असून नागपूरचे अभियंता कौस्तुभ गिरीश देशपांडे यांच्याशी लग्न झाल्यानंतर हे दांपत्य गेली २ वर्षें जकार्तामध्ये आहे. मिण्डा या भारतीय कम्पनीत कौस्तुभ अधिकारी आहेत.
पोचो पोचो या परम्परागत इंडोनेशियाई नृत्याचा रस्त्यावरील सर्वात मोठा आविष्कार पाहण्यासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर्सच्या अधिकारी पॉलिना स्वत: हजर होत्या. तसेच राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनीही या नृत्यात भाग घेऊन देशवासियांचा उत्साह वाढविला.

Web Title: Vidarbha's Snehal's participation in the Guinness record of Indonesia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.