विदर्भात भारत बंदला ग्रामीण भागात उत्स्फूर्त पाठिंबा; शहरे अंशत: सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 10:40 AM2020-12-08T10:40:01+5:302020-12-08T11:02:12+5:30

Nagpur News Bharat Band केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ८ डिसेंबरच्या बंदचा प्रारंभ विदर्भात संमिश्र प्रतिसादाने झाला.

Vidarbha's spontaneous support to 'Bharat Band' in rural areas; Cities partially resumed | विदर्भात भारत बंदला ग्रामीण भागात उत्स्फूर्त पाठिंबा; शहरे अंशत: सुरू

विदर्भात भारत बंदला ग्रामीण भागात उत्स्फूर्त पाठिंबा; शहरे अंशत: सुरू

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ८ डिसेंबरच्या  भारत बंदचा प्रारंभ विदर्भात संमिश्र प्रतिसादाने झाला.
चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 

नागपूर शहरात वाहतूक अंशत: सुरू आहे. बाजारपेठा काही प्रमाणात सुरू झाल्या आहेत. 
यवतमाळ जिल्ह्यात आर्णी व राळेगाव तालुक्यात मोजके अपवाद वगळता सर्वत्र शुकशुकाट आहे. एसटी बससेवा सुरू आहे मात्र प्रवासी अत्यंत तुरळक आहेत. कळंब येथे बंदला फारसा प्रतिसाद नाही. गावात नागरिकांची वर्दळ सुरू आहे. महागाव तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

गोंदियात महाविकास आघाडीने रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले.

गडचिरोलीत बंदला सर्वत्र प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील ऑटोरिक्शासह अन्य वाहतूक बंद आहे. बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: Vidarbha's spontaneous support to 'Bharat Band' in rural areas; Cities partially resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.