प्रेयसीला मारहाण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:11+5:302021-07-05T04:06:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अल्पवयीन प्रेयसी दुसऱ्याशी कनेक्ट झाल्याच्या संशयावरून तिचे अपहरण करून तिला प्रियकराने धावत्या दुचाकीवर मारहाण ...

Video of beating girlfriend goes viral on social media | प्रेयसीला मारहाण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रेयसीला मारहाण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अल्पवयीन प्रेयसी दुसऱ्याशी कनेक्ट झाल्याच्या संशयावरून तिचे अपहरण करून तिला प्रियकराने धावत्या दुचाकीवर मारहाण केली. त्याचा व्हिडिओ बनवून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा संतापजनक प्रकार उघड होताच दोन भामट्यांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. समीर खान सलीम खान (वय १९, रा. बंगाली पंजा, पाचपावली) आणि मोहम्मद शाकिन मोहम्मद सिद्दिकी (वय २५, रा यशोदानगर) अशी त्यांची नावे आहेत.

आरोपी स्वतःला टिक टॉक स्टार म्हणवून घेत चमकोगिरी करत फिरतात. आरोपी समीरचे एका १७ वर्षीय मुलीसोबत २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी एका बर्थ डे पार्टीत ती दुसऱ्या एका युवकासोबत सलगी करताना दिसल्यामुळे समीर अस्वस्थ झाला. त्याने तिला धारेवर धरणे सुरू केले. त्यामुळे ती समीरला टाळू लागली. यातून आपली प्रेयसी दुसऱ्यासोबत कनेक्ट झाल्याचा त्याला संशय आला. तिला धडा शिकवण्यासाठी त्याने तिच्या अपहरणाचा कट रचला. १८ जूनला त्याने तिला कमाल चौकात भेटायला बोलावले. यावेळी समीर सोबत त्याचा साथीदार शाकिन होता. या दोघांनी जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसवले. तिला मारहाण करत वीटभट्टी चौकात नेले. हे करतानाच धावत्या दुचाकीवरील मारहाणीचा व्हिडिओही आरोपींनी बनविला. तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या मित्रांनी तो पोलीस अधिकाऱ्यांना पाठविला. त्यावरून पोलिसांनी व्हिडिओ बनविणार्‍या आणि अपलोड करणाऱ्या आरोपी समीर आणि शाकीनचा शोध घेतला आणि त्यांना शनिवारी अटक केली.

फेसबुकवरची ओळख भोवली

मुलीने पोलिसांकडे या घटनेची माहिती देताना आरोपी समीरसोबत दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाल्याचे आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे सांगितले.

---

लैंगिक छळही केला

आरोपीने लैंगिक छळ करून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

---

Web Title: Video of beating girlfriend goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.