Video: देवेंद्र फडणवीस आधीच म्हणाले होते, 'तेजस' तिसरंही 'गोल्ड मेडल' जिंकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 01:21 PM2023-10-07T13:21:34+5:302023-10-07T13:22:34+5:30

ओजसच्या या सोनेरी कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन त्याचं कौतुक केलंय.

Video: Devendra Fadnavis had already said, 'Tejas' will win the third 'Gold Medal' in asian games | Video: देवेंद्र फडणवीस आधीच म्हणाले होते, 'तेजस' तिसरंही 'गोल्ड मेडल' जिंकणार

Video: देवेंद्र फडणवीस आधीच म्हणाले होते, 'तेजस' तिसरंही 'गोल्ड मेडल' जिंकणार

googlenewsNext

नागपूर/मुंबई - चीनमध्ये होणाऱ्या यंदाच्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. १४ व्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय तिरंदाजांनी चार पदके जिंकली आणि त्यानंतर कबड्डी संघाने सुवर्ण जिंकून भारताचे पदकांचे शतक पूर्ण केले. त्यामध्ये २५ सुवर्ण पदकांचा समावेश असून त्यापैकी ३ सुवर्ण पदक नागपूरच्या ओजस देवतळेने जिंकले आहेत. ओजसने शनिवारी तिरंदाजीत कंपाउंड इव्हेंटमध्ये (वैयक्तिक) गोल्ड मेडल पटकावले. तत्पूर्वी, त्याने मेन्स टीम कंपाऊंड आणि मिक्स टीम कंपाउंड मध्येही सुवर्ण जिंकले आहे.

ओजसच्या या सोनेरी कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन त्याचं कौतुक केलंय. तर, उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन ओजसच्या कामगिरीचं कौतुक करत त्याचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे ओजसने २ गोल्ड मेडल जिंकल्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी ओजसच्या आई-वडिलांचे फोनवरुन अभिनंदन केले होते. ओजसची कामगिरी नागपूरकरांना आणि देशवासीयांना अभिमान वाटणारी आहे, असे ते म्हणाले. तसेच, ओजस नक्कीच तिसरही गोल्ड जिंकेल, असा मला विश्वास आहे, असेही फडणवीसांनी फोनवरुन म्हटले होते. 

देवेंद्र फडणवीसांचा आणि देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरवत ओजसने तिसरे गोल्ड जिंकले. त्यानंतर, फडणवीसांनी ट्विट करुन आपला व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, ओजसचे अभिनंदनही केलं आहे. 

भारताने दररोज केली पदकांची कमाई

भारताने पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, आठव्या दिवशी १५, नवव्या दिवशी सात, दहाव्या दिवशी नऊ, ११व्या दिवशी १२, १२व्या दिवशी आणखी पाच, १३व्या दिवशी नऊ पदके जिंकली होती. भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण १०० पदके पटकावली आहेत. यामध्ये २५ सुवर्णपदके आहेत. भारताच्या मुलींनी महिला कबड्डीमध्ये चिनी तैपेईचा २६-२४ असा रोमहर्षक अंतिम सामन्यात पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारतासाठी हे ऐतिहासिक सुवर्णपदक ठरले. कारण यामुळे भारताला एकूण १०० वे पदक आणि २५ वे सुवर्ण मिळाले आहे.

मोदींनीही व्यक्त केला आनंद 

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट केले, “प्रत्येक आश्चर्यकारक कामगिरीने इतिहास रचला आणि आमचे हृदय अभिमानाने भरले. मी १० ऑक्टोबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत करीन आणि त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

Web Title: Video: Devendra Fadnavis had already said, 'Tejas' will win the third 'Gold Medal' in asian games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.