Video ; मराठा आरक्षण चर्चेचा प्रस्ताव सरकारने धुडकावला - मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 01:55 PM2018-07-19T13:55:04+5:302018-07-19T13:59:43+5:30
मराठा आरक्षणासंदर्भात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकार अकार्यक्षम असल्याचा आरोप केला आहे. मी स्वत: विधानपरिषदेत
नागपूर - मराठा आरक्षणासंदर्भात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकार अकार्यक्षम असल्याचा आरोप केला आहे. मी स्वत: विधानपरिषदेत मराठा आरक्षणसंदर्भात 289 अन्वये स्थगन प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाच्या माध्यमातून मराठी आरक्षणावर चर्चा करा, अशी मागणी केली. मात्र, सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली नसल्याचे मुंडे यांनी म्हटले.
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे कुठलेही शास्वत उत्तर नाही. याबाबत सरकारने अद्यापही मागासवर्गीय आगोयाकडे विचारणा केली नाही. यावरुन सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच मी विधानपरिषदेत हा मुद्दा चर्चेला घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नाही. आज मराठा आरक्षणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे स्वयंसेवक आक्रमक झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी आक्रोश आणि आंदोलन करत आहेत. त्यामुळे उद्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही मी विधानपरिषदेत बोललो. पण, सरकारकडे याबाबतच्या चर्चेला वेळ आणि कुठलेही उत्तर नसल्याचे मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली आहे. 18 जुलैपासून परळी येथे मराठा समाजाच्या मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन उद्या नागपूरमध्ये धडक देण्याची शक्यता आहे.