Video : नागपूरात ‘सिंबायोसिस’ विद्यापीठ, विद्यार्थ्यांना फी मध्ये 15 टक्के सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 10:32 PM2019-07-28T22:32:28+5:302019-07-28T22:37:09+5:30
नितीन गडकरी : ‘सिंबॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नागपूर कॅम्पस’चे थाटात उद्घाटन
नागपूर : उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या स्थापनेमुळे ‘एज्यूकेशन हब’ म्हणून उदयास येणाऱ्या उपराजधानी नागपुरात ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामुळे इथल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले.
वाठोडा परिसरात सुमारे ७५ एकरावर असलेल्या सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपूर कॅम्पसचे उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधिर मुनंगटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शं. बा. मुजुमदार, उपकुलगुरू डॉ. विजया येरवडेकर, महापौर नंदा जिचकार, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपास्थित होते.
पूर्वी विदर्भातून राज्याच्या इतर भागात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जात होते. पण आता नागपूरध्येच या सर्व संधी उपलब्ध झाल्या आहेत. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित असून शैक्षणिक शुल्कातही १५ टक्के सवलत उपलब्ध आहे. ही सवलत संपूर्ण विदर्भाकरिता लागू करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे गडकरी यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते निधीमघून २० कोटीची तरतूद करून विद्यापीठाकडे येण्यासाठीच्या रस्त्याचे सिंमेट काँक्रेटीकरण करण्यात येईल व या परिसरात मेट्रो स्टेशन आल्याने येथे सहज पोहोचता येईल. विद्यापीठ परिसरात ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करून रस्त्यालगत सौंदर्यीकरणाची जबाबदारी विद्यापीठाने उचलावी, असेही गडकरी म्हणाले. शैक्षणिक संस्थामध्ये दिल्या जाणाºया गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच युवाशक्तीचे रूपांतर मानव संसाधनामध्ये होऊ शकते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
हे आहेत अभ्यासक्रम
‘सिंबायोसिस’मध्ये सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मँनेजमेंट, लॉ स्कूल, स्कूल ऑफ प्लानिंग, ऑर्किटेक्चर अँड डिझाईन या ३ संस्था सुरू करण्यात आल्या असून, यामध्ये एम. बी.ए, बी.बी.ए, बी.आर्क, एल.एल.बी व एल. एल. एम. हे अभ्यासक्रम जून-२०१९ या सत्रापासून सुरु करण्यात आले आहेत.
नागपूरात ‘सिंबायोसिस’ विद्यापीठ pic.twitter.com/id76lBRZRy
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2019