जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी'

By admin | Published: January 10, 2016 07:28 PM2016-01-10T19:28:30+5:302016-01-10T21:03:14+5:30

जळगावच्या विजय चौधरी याने मुंबईच्या विक्रांत जाधवचा ६-३ ने पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' ची गदा पटकावली आहे.

Vijay Chaudhary, Jalgaon, for the second year in a row, 'Maharashtra Kesari' | जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी'

जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी'

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १० - जळगावच्या विजय चौधरी याने मुंबईच्या विक्रांत जाधवचा ६-३ ने पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' ची गदा पटकावली आहे. चुरशीच्या अंतीम सामन्यात केवळ १५ सेकंद बाकी असताना जळगावच्या विजयने मुंबईच्या विक्रांतला चितपट केले. विजय चौधरीला रोख २९ हजार रुपये आणी मानचिन्ह(गदा) देऊन गौरवण्यात आले. 
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१६ च्या विजेत्यास थेट पोलीस दलात घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे विजय चौधरी हा आता महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत होणार हे नक्की झाले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली होती. अहमदनगरचा केवल भिंगारे यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
 
नागपूरमध्ये सुरु असलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी'चा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला. मॅट विभागातून मुंबईच्या विक्रांत जाधवने अंतिम फेरीत पुण्याच्या महेश मोहोळचा पराभव करत महाराष्ट्र केसरीच्या अंतीम सामन्यात प्रवेस केला होता. तर दुसरीकडे माती विभागातून जळगावच्या विजय चौधरीने सोलापूरच्या बाला रफिक शेखवर मात करत महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी दंड थोपटले होते. 
 
पराभूत मल्लाला प्रेक्षकांनी डिवचल्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले. या हाणामारीत काही मल्लांसह त्यांचे समर्थक किरकोळ जखमी झाले. दंगलखोर प्रेक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.चिटणीस पार्कवर शनिवारी सायंकाळी पुणे शहरचा महेश मोहोळ आणि पुणे जिल्ह्याचा राहुल खणेकर या मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरी गादी गटातील चुरशीची लढत झाली होती.  येवढी घटना सोडता ही स्पर्धा अतीशय चांगल्या पद्धतीने पार पडली असल्याची माहीती समोर आली आहे. 

Web Title: Vijay Chaudhary, Jalgaon, for the second year in a row, 'Maharashtra Kesari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.