शांतता प्रस्थापनेत प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर विजय दर्डा यांचे 24 सप्टेंबरला उद्बोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:10 PM2020-09-23T17:10:30+5:302020-09-23T17:17:01+5:30
'जगात सांस्कृतिक शांतता स्थापित करण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका' या विषयावर लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा मार्गदर्शन करणार आहेत.
पुणे: लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा हे ‘जगात शांतता स्थापित करण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. पुणे येथील ‘एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’तर्फे आयोजित प्रसारमाध्यमे व पत्रकारितेबाबत आयोजित द्वितीय राष्ट्रीय परिषदेत २४ सप्टेंबर रोजी दर्डा यांचे विशेष सत्र होणार आहे. यावेळी व्यक्तींच्या विश्वास व संस्कृतीमध्ये धर्म कसा रोवल्या गेला आहे आणि शांतता स्थापित करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी काय भूमिका निभावली पाहिजे, या विषयावर विजय दर्डा बोलतील. दुपारी दीड ते तीन या कालावधीत हे उद्बोधन होईल. तीन वेळा राज्यसभा सदस्य राहिलेले व साऊथ एशियन एडिटर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष असलेले दर्डा हे तज्ज्ञ वक्ता म्हणून सखोलपणे आपली मते मांडतील.
ज्यांना या सत्रात सहभागी व्हायचे आहे त्यांनी https://www.mitwpu-ncmj.com/ या ‘लिंक’वर नोंदणी करावी.