डिजिटल प्लॅटफॉर्मवर गीतकाराच्या रूपात विजय दर्डा यांचे पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 12:37 AM2021-02-28T00:37:29+5:302021-02-28T00:41:15+5:30

Vijay Darda's appearance as a lyricist लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांचे आता एक नवीन रूप जनतेसमोर येणार आहे. ‘तेरी महफिल से उठकर....’ या रुहानी नज्मच्या माध्यमातून ते गीतकार म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहेत.

Vijay Darda's appearance as a lyricist on a digital platform | डिजिटल प्लॅटफॉर्मवर गीतकाराच्या रूपात विजय दर्डा यांचे पदार्पण

डिजिटल प्लॅटफॉर्मवर गीतकाराच्या रूपात विजय दर्डा यांचे पदार्पण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर -लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांचे आता एक नवीन रूप जनतेसमोर येणार आहे. ‘तेरी महफिल से उठकर....’ या रुहानी नज्मच्या माध्यमातून ते गीतकार म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहेत.

त्यांनी रचलेल्या गझलेला जयपूर घराण्याचे विश्वप्रसिद्ध गायक उस्ताद अहमद हुसेन आणि उस्ताद मोहम्मद हुसेन यांनी स्वरांमध्ये गुंफले आहे व त्याचा स्वरसाजही हुसेन बंधूंनीच चढवला आहे. ‘वीर जारा’ या चित्रपटात त्यांनी गायलेली ‘आया तेरे दर पर दीवाना’ ही कव्वाली आजही संगीतप्रेमींच्या हृदयात साठवलेली आहे.

रेड रिबन एंटरटेन्मेंट या प्रसिद्ध म्युझिक कंपनीने या अल्बमला डिजिटल प्लॅटफार्मवर सादर केले आहे. उल्लेखनीय म्हणजे रेड रिबन अनेक भाषांमधील चित्रपट संगीत, भक्तिगीत, फ्युजन, सुफी, गझल, शास्त्रीय व क्षेत्रीय संगीताची निर्मिती, वितरण आणि विपणन क्षेत्रात अग्रणी आहे.

‘तेरी महफिल से उठकर’ या नज्मला सात डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये - यू-ट्युब, विंक म्युझिक, अमेजन म्युझिक, आय-ट्युन्स, जिओ-सावन, अ‍ॅप्पल म्युझिक व साउंड क्लाउड यांचा समावेश आहे. याला संगीतप्रेमींकडूनही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. विजय दर्डा यांनी सांगितले, त्यांनी या नज्मच्या सुरुवातीच्या ओळी काही वर्षांपूर्वी लिहिल्या होत्या. या ओळी त्यांनी प्रसिद्ध गीतकार नीरज यांनाही ऐकविल्या होत्या. त्या ऐकून नीरज यांनी ‘हकीकत’ चित्रपटातील कैफी आझमी यांनी रचलेल्या एका गाण्यातील ‘मैं यह सोचकर उसके दर से उठा था’ या ओळी त्यांना ऐकविल्या. विजय दर्डा यांनी त्यांच्या नज्मचे उरलेले शेर गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात पूर्ण केले.

ही नज्म रचण्यामागे प्रेरणा आहे ती, त्यांनी धर्मपत्नी ज्योत्स्ना दर्डा यांच्यासवे घालविलेल्या स्मरणीय क्षणांची आणि सोबतच त्या गेल्यानंतर होत असलेल्या विरहाच्या वेदनाही त्यात स्पष्ट जाणवतात. हुसैन बंधूंनी त्यांच्या अजोड गायन आणि नायाब संगीताने या रचनांना अत्यंत आनंददायी बनविले आहे. विजय दर्डा त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासूनच कविता, गझल, नज्म लिहीत राहिले आहेत. त्यांच्या अनेक रचना ‘स्क्रीनराइटर्स असोसिएशन’च्या साइटवर उपलब्ध आहेत. हे फिल्म, टीव्ही, ऑडियो आदींमध्ये लेखन करणाऱ्या गीतकारांचे संघटन आहे.

Web Title: Vijay Darda's appearance as a lyricist on a digital platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.