अतिथींविना होणार संघाचा विजयादशमी उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:06 PM2020-10-20T23:06:25+5:302020-10-20T23:07:40+5:30

Vijayadashami celebration of Sangh, Nagpur News कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे यंदा विजयादशमी उत्सवाच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे रेशीमबाग मैदानात आयोजन न करता स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कार्यक्रम होईल. यंदा स्वयंसेवकांची कवायती व प्रात्यक्षिके होणार नसून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे भाषण होणार आहे. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात प्रथमच अतिथींना निमंत्रण दिल्याशिवायच संघाचा विजयादशमी उत्सव पार पडणार आहे.

Vijayadashami celebration of Sangh will be held without guests | अतिथींविना होणार संघाचा विजयादशमी उत्सव

अतिथींविना होणार संघाचा विजयादशमी उत्सव

Next
ठळक मुद्देमर्यादित उपस्थिती राहणार, कवायती नाहीत : सरसंघचालकांचे भाषण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे यंदा विजयादशमी उत्सवाच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे रेशीमबाग मैदानात आयोजन न करता स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कार्यक्रम होईल. यंदा स्वयंसेवकांची कवायती व प्रात्यक्षिके होणार नसून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे भाषण होणार आहे. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात प्रथमच अतिथींना निमंत्रण दिल्याशिवायच संघाचा विजयादशमी उत्सव पार पडणार आहे.

संघासाठी विजयादशमी उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. संघ प्रमुखांच्या मार्गदर्शनाकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. यात संघाच्या भावी योजनांचे संकेतदेखील मिळतात. दरवर्षी हजारो स्वयंसेवक, व्हीव्हीआयपी नेते व नागरिक या उत्सवाला उपस्थित असतात. . मागील काही वर्षांपासून संघाच्या कार्यक्रमांमध्ये विविध विचारधारेच्या व्यक्ती दिसून येत असून विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींकडेदेखील सर्वांचे लक्ष असते. मात्र यंदा प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे अतिथींविनाच हा कार्यक्रम होणार आहे. २०१७ साली झालेल्या विजयादशमी सोहळ्यात जालंधर येथील श्री गुरू रवीदास साधुसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले होते व त्यांनी त्याचा स्वीकारदेखील केला होता. मात्र ऐनवेळी प्रकृती खराब झाल्यामुळे ते प्रत्यक्ष येऊ शकले नव्हते व त्यांनी लिखित संदेश पाठविला होता.

यंदा कोरोनाचे सावट असल्याने संघाने कार्यक्रमाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महर्षी व्यास सभागृहात केवळ ५० निवडक स्वयंसेवकांना प्रवेश देण्यात येणार आहे. यात घोषपथकाचादेखील समावेश असेल. सरसंघचालकांचे भाषण ऑनलाईन प्रसारित करण्यात येणार आहे. शासकीय नियमावलींचे पालन करत मर्यादित उपस्थितीवर भर देण्यात आला असल्याची माहिती महानगर संघचालक राजेश लोया व सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी दिली आहे.

लहान गटांमध्ये कार्यक्रम होणार

दरम्यान, शाखानिहाय विजयादशमी उत्सव लहान लहान गटांमध्ये घेण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. गटांमध्ये कार्यक्रम घेत असताना संख्या १० च्या आतच असावी. तसेच सरसंघचालकांचे ‘ऑनलाईन’ भाषण ऐकत असताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे अशी सूचनादेखील देण्यात आली आहे.

Web Title: Vijayadashami celebration of Sangh will be held without guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.