गोविंदप्रसाद उपाध्याय यांना विक्रम मारवाह सन्मान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:14+5:302021-01-20T04:09:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भ सेवा समितीच्यावतीने श्री आयुर्वेद महाविद्यालयाचे सचिव व साहित्यिक डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय यांना पद्मश्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ सेवा समितीच्यावतीने श्री आयुर्वेद महाविद्यालयाचे सचिव व साहित्यिक डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय यांना पद्मश्री डॉ. विक्रम मारवाह चिकित्सक हिंदी सेवा सन्मान प्रदान करण्यात आला. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते हा पुरस्कार उपाध्याय यांनी स्वीकारला.
प्रेस क्लबमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया यांच्यासह विदर्भ सेवा समितीचे अध्यक्ष आनंद निर्बाण, कार्याध्यक्ष डॉ. संतोष मोदी, सचिव अशोक गाेयल उपस्थित होते.
यावेळी बोलताना बनवारीलाल पुरोहित यांनी डॉ. उपाध्याय यांना ‘कर्मवीर’ संबोधले. श्रीमद् भगवद्गीतेच्या शिकवणुकीप्रमाणे फळाची चिंता न करता आपले कर्म करीत उपाध्याय यांनी समाजसेवा केल्याचे ते म्हणाले. दयाशंकर तिवारी यांनी डॉ. उपाध्याय यांच्या साहित्यविषयक कार्यावर प्रकाश टाकला. तत्पूर्वी चेतन मारवाह, डॉ. लोकेंद्र सिंह, विजय शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. संतोष मोदी यांनी केले. संचालन आनंद निर्बाण यांनी केले. आभार अशोक गोयल यांनी मानले. याप्रसंगी बाबूलाल नेवटिया, डॉ. मनमोहन डागा, राजेंद्र बंसल, धरमपाल अग्रवाल, दर्पण अग्रवाल, संजय भेंडे, जयप्रकाश पारेख, किशन शर्मा, संजय पाण्डेय आदी उपस्थित होते.
सन्मान निधी समितीला केली दान
डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय यांनी यावेळी पुरस्कारादाखल मिळालेला २१ हजार रुपयांचा निधी विदर्भ सेवा समितीला दान केला. हा निधी सत्कार्यासाठी खर्च करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
.......