राष्ट्रधर्म युवा मंचद्वारे ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:11+5:302021-06-29T04:07:11+5:30

बडेगाव : राष्ट्रधर्म युवा मंचच्या वतीने सावनेर तालुक्यातील निमतलाई (कोथुळणा) श्री संत कबीर व छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती ...

Village cleanliness, tree planting by Rashtradharma Yuva Manch | राष्ट्रधर्म युवा मंचद्वारे ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण

राष्ट्रधर्म युवा मंचद्वारे ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण

Next

बडेगाव : राष्ट्रधर्म युवा मंचच्या वतीने सावनेर तालुक्यातील निमतलाई (कोथुळणा) श्री संत कबीर व छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी शनिवारी (दि. २६) व रविवारी (दि. २७) कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ग्रामस्वच्छता व वृक्षाराेपण अभियान राबविण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. स्थानिक नागरिकांना वैयक्तिक व सामूहिक स्वच्छता व वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तरुणांमध्ये राष्ट्रधर्म व राष्ट्रकार्य ही भावना रुजविण्यासाठी आकाशपाल निस्ताने यांच्या प्रबाेधनात्मक कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या अभियानात मयूर कडू, वैभव निस्ताने, मोंटू निस्ताने, हिमांशू निस्ताने, मनीष कडू, लोकेश निस्ताने, ओम कडू, धीरज चौधरी, उत्कर्षा घ्यार, हर्षदा निंबाळकर, भूषण निंबाळकर, कवडू गवळी, जगदीश निस्ताने, भगवान घ्यार, युवराज निंबाळकर, गोलू नेवारे, सुखदेव निस्ताने, धनराज निस्ताने, कैलास रहिले, गणपत निस्ताने, सुधाकर चौधरी, क्षीरसागर गुरुजी, मधुरपाल, फत्तू घ्यार, हर्षल चौधरी, साहिल नेवारे, अखिलेश नेवारे, प्रणय कडू, प्रकाश लांजेवार, राजेंद्र निरमोही, हेमराज निरमोही, अभिषेक निरमोही, अमित चौधरी, मधू चौधरी, थानसिंग निस्ताने, किशोर सरिले, प्रदीप चौधरी, अनिल कडू, शरद चौधरी सहभागी झाले हाेते. राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Web Title: Village cleanliness, tree planting by Rashtradharma Yuva Manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.