जलप्रकोप! जुनापाणी गाव पहाटेच्या झोपेत असताना तलाव फुटला; १३ हेक्टर शेती पाण्याखाली, १८१ जनावरे वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 08:00 AM2022-07-16T08:00:00+5:302022-07-16T08:00:02+5:30

शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्यासुमारास मंगरूळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या ७० लोकांची वस्ती असलेल्या जुनापाणी गावावर संकट कोसळले!

Village drowned! The dam of the lake burst and 'Junapani' village became waterlogged! | जलप्रकोप! जुनापाणी गाव पहाटेच्या झोपेत असताना तलाव फुटला; १३ हेक्टर शेती पाण्याखाली, १८१ जनावरे वाहून गेली

जलप्रकोप! जुनापाणी गाव पहाटेच्या झोपेत असताना तलाव फुटला; १३ हेक्टर शेती पाण्याखाली, १८१ जनावरे वाहून गेली

googlenewsNext
ठळक मुद्देगावात सर्वत्र हाहाकार, १३ हेक्टर शेती पाण्याखाली ग्रामस्थांनी जीव वाचविण्यासाठी घेतला टेकडीचा आधार

चंदू बोरकर

नागपूर : गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर ग्रामीण तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. अशातच शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्यासुमारास मंगरूळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या ७० लोकांची वस्ती असलेल्या जुनापाणी गावावर संकट कोसळले! गावाशेजारी असलेल्या तलावाचा बांध फुटल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. तलावाचे पाणी गावात शिरल्याने गावातील लोकांनी जीव वाचविण्यासाठी टेकडीकडे धाव घेतली. मात्र, पुराच्या पाण्याने गावातील १६ घरांतील अन्न-धान्याचे प्रचंड नुकसान झाले. गावातील १३ हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली आली. याशिवाय १८१ पाळीव जनावरे वाहून गेली.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या मुसळधार पावसाने जुनापाणी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला होता. शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान बांध फुटल्याने तलावाचे पाणी गावात शिरले. येथील ग्रामस्थ झोपेत असतानाच गावातील १८१ पाळीव जनावरे वाहून गेली. यामध्ये १८ गाई, ५ बैल, ७१ बकऱ्या, १ वासरू, ८६ कोंबड्यांचा समावेश आहे. तलावाचे पाणी गावातील १६ घरांत शिरले. याशिवाय शिवारातील १३ हेक्टर क्षेत्रातील कापूस आणि तूर पिकाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आशिष वानखेडे यांनी जुनापाणी गाठले. ग्रामस्थांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले. गावातील नुकसानीचा अहवाल मंडळ अधिकारी सुधाकर राठोड व तलाठी अल्का मुळक यांनी तालुका प्रशासनाला सादर केला आहे.

झाेपेत असताना पहाटे तलावाचा बांध फुटल्यामुळे आरडाओरड ऐकू आली. जीव वाचविण्यासाठी आम्ही टेकडीकडे धाव घेतली. तलावाच्या पाण्यात माझ्या पाच बकऱ्या, चार गाई व सहा कोंबड्या वाहून गेल्या.

- रवींद्र हंसराज उईके, ग्रामस्थ

तलावाचे पाणी गावात पहाटे पाच वाजता शिरल्याने पुरात माझे दोन बैल व तीन बकऱ्या वाहून गेल्या. शासनाने तातडीने मदत करावी. आमच्या घरचे धान्यही भिजले आहे.

- पंचफुला वसंता वरकाडे, ग्रामस्थ.

Read in English

Web Title: Village drowned! The dam of the lake burst and 'Junapani' village became waterlogged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर