पाचगावच्या सभोवतालची गावेही घेणार दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:36+5:302021-01-25T04:09:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : केंद्र सरकारच्या सांसद आदर्श गाव संकल्पनेतून उमरेड तालुक्यातील पाचगावची निवड करण्यात आली. चेहरामोहरा बदलविला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : केंद्र सरकारच्या सांसद आदर्श गाव संकल्पनेतून उमरेड तालुक्यातील पाचगावची निवड करण्यात आली. चेहरामोहरा बदलविला. आता शेणापासून पेंट निर्मितीचा प्रकल्प उभारून सुमारे पाच हजार बेरोजगारांना रोजगाराची हमी देत असून, टप्प्याटप्प्याने पाचगावच्या सभोवतालची काही गावेही दत्तक घेणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाचगाव येथे केली.
सासंद आदर्श गाव असलेल्या पाचगावातील विविध कामांचा गडकरी यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी पाचगाव येथील एकनाथ हॅन्डलूम बुनकर सहकारी संस्थेला भेट दिली. सदर क्लस्टरचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे, याबाबतही माहिती घेतली. भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा, महिला आघाडी, नागपूर जिल्हा यांच्यावतीने गडकरी यांची लाडुतुला करण्यात आली.
याप्रसंगी माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, अरविंद गजभिये, अजय बोढारे, डॉ. शिरीष मेश्राम, आनंद राऊत, जयकुमार वर्मा, संध्या गोतमारे, संकेत बावनकुळे, नीलेश बुचुंडे, वसंता पंधरे, पांडुरंग शेगर, रजनी लोणारे, माया पाटील, पुण्यशीला मेश्राम, दादाराव मुटकुरे, केशव ब्रम्हे, सुनील जुवार, भास्कर येंगळे, डॉ. शिवाजी सोनसरे, वामन श्रीरामे, रोहित पारवे, कपिल आदमने, अंजली कानफाडे, स्वाती उईके, गोविंदा इटनकर, राजकुमार कोहपरे आदींची उपस्थिती होती. संचालन दिलीप सोनटक्के यांनी केले. रामाजी हटवार यांनी आभार मानले.