विनोदकुमार नागपूर तर पवित्रकुमार रामटेकचे निवडणूक निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:41 PM2019-03-18T22:41:50+5:302019-03-18T22:43:36+5:30
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नागपूर लोकसभा मतदार संघासाठी विनोदकुमार यांची तर रामटेक लोकसभासाठी जे. पवित्रकुमार यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नागपूर लोकसभा मतदार संघासाठी विनोदकुमार यांची तर रामटेक लोकसभासाठी जे. पवित्रकुमार यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विनोदकुमार हे २००५ या बॅचचे भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी असून, सुरत येथे अतिरिक्त आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. नागपूर येथे रविभवन येथील कॉटेज क्रमांक ७ येथे निवडणूक काळात वास्तव्य आहे.
तसेच जे. पवित्रकुमार हे भारतीय महसूल सेवेच्या २००८ च्या बॅचचे अधिकारी असून, तिरुचेरापल्ली येथे सहआयुक्त आयकर म्हणून कार्यरत आहेत. रामटेक लोकसभा व काटोल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी खर्चविषयक निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. निवडणूक काळात रविभवन येथील कॉटेज क्रमांक ४ मध्ये त्यांचे वास्तव्य आहे.