स्क्रॅपेज पॉलिसीनंतरही विंटेज कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:09 AM2021-02-07T04:09:19+5:302021-02-07T04:09:19+5:30
- ५० वर्षे व त्यापेक्षा जास्त जुन्या कार हेरिटेजचा भाग : स्क्रॅपेज पॉलिसीत सूट मेहा शर्मा नागपूर : अर्थमंत्री ...
- ५० वर्षे व त्यापेक्षा जास्त जुन्या कार हेरिटेजचा भाग : स्क्रॅपेज पॉलिसीत सूट
मेहा शर्मा
नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात जुनी आणि अयोग्य वाहने बाहेर काढण्यासाठी ऐच्छिक वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर केले आहे. पण या धोरणाची विंटेज कार मालकांना काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण ५० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांमध्ये हे नियम लागू नाहीत.
व्हिंटेज कारप्रेमींसाठी ही केवळ वाहनेच नाहीत तर वारसाचा भाग आहेत. नागपुरातही अनेक व्हिंटेज कारप्रेमी आहेत.
व्यावसायिक शिरीष देवधर म्हणाले, व्हिंटेज कारला या नियमातून वगळले आहे. व्हिंटेज वाहनांची ओळख म्हणून या कारला स्वतंत्र नंबरप्लेट दिल्या जातात. या कारच्या मालकांना कार रस्त्यावर चालविण्याची मुभा आहे. याकरिता परिवहन मंत्रालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते. आमची संघटना इतरही अनेकांनी या कारच्या संरक्षणासाठी लढा दिला आहे. त्यासाठी परिवहन मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. जुन्या स्मारकांप्रमाणेच या कार देशाचा वारसा आहेत आणि म्हणूनच आपण या कारचे संरक्षण केले पाहिजे. या कारवरील तरतुदींचा तपशील मंत्रालयाने अद्याप दिलेला नाही. जे लोक या वारसाचे रक्षण करतात, त्यांना याला नाकारण्याची सक्ती केली जाणार नाही. देशभरात लोकप्रिय व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन केले जाते. नागपुरातही दरवर्षी अशा अनेक रॅलींचे आयोजन करण्यात येते.
सेंट्रल इंडिया व्हिंटेज असोसिएशन, नागपूरचे उपाध्यक्ष शाहरुख कसाड गेल्या ३० वर्षांपासून व्हिंटेज कार आणि इतर रॅलीमध्ये भाग घेत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून रॅली आणि लांबपल्ल्याच्या मोटोरिंग मोहिमांचे आयोजन करीत आहेत. व्हिंटेज कार वेगळ्या विभागात येतात. या वाहनांच्या नोंदणी खर्चात वाढ होणार असली तरी अर्थ मंत्रालयाने आतापर्यंत किती टक्केवारी वाढविली, यावर स्पष्ट केले नाही. ५० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक जुन्या कारला स्क्रॅपेज नियमांमधून सूट देण्यात आली आहे. मंत्रालयाकडून योग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी होण्याची वाट पाहात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुर्मीळ प्रसंगी रस्त्यावर येणाऱ्या कारसाठी जादा नोंदणी शुल्क आकारणे हे व्हिंटेज कारप्रेमींना आवडणार नाही. अरूण उपाध्याय म्हणाले, जुन्या कार हेरिटेजसारख्या असतात, त्यासाठी अधिक नोंदणी शुल्क का द्यावे. कारण या कार क्वचितप्रसंगी बाहेर काढतो. संस्कृतीतल्या या कार अनेक वर्षांपासून जपून ठेवल्या आहेत. मग नोंदणीसाठी आम्ही जादा पैसे का द्यावेत?
कमलेश सेरवैया म्हणाले, शासन आणि आरोग्य व सुरक्षेच्या नियमांमध्ये सतत सुधारणा करणे हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. तथापि, व्हिंटेज कारची सांस्कृतिक समृद्धता व वारसा हा आरोग्य आणि सुरक्षिततेच्या योग्यतेने विचारात घेऊन जतन केले जाणे आवश्यक आहे.
भारताचा समृद्ध वारसा आणि संस्कृती आहे आणि ही जुनी वाहने समृद्ध भूमिकेचा भाग आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे, परंतु या सुंदर कारला त्रास न देता शहराच्या रस्त्यांवर धावण्याची परवानगी द्या.