मौद्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:22+5:302021-03-16T04:09:22+5:30
मौदा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची साखळी खंडित करण्यासाठी नागपूर शहरात सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात सायंकाळी ...
मौदा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची साखळी खंडित करण्यासाठी नागपूर शहरात सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात सायंकाळी ६ वाजेपासून सकाळपर्यंत प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सोमवारी मौदा येथील दुकानदारांनी सायंकाळी ७ वाजतानंतरही दुकाने सुरू ठेवली आहे. नगरपंचायतीच्या वतीने दिवसभर भोंगा वाजवून सायंकाळी ६ वाजता दुकाने बंद करण्याचे आवाहन येथील व्यावसायिकांना केले. मात्र तहसील कार्यालया समोरील व शहराच्या मुख्य मार्गावरील दुकाने ७ वाजतानंतरही सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे येथील स्थानिक प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मौदा हे तालुक्याचे ठिकाण आहे. नागपूर शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर आहे. येथे एनटीपीसीचा मोठा प्रकल्प असल्याने बाहेरील नागरिकांचे आवागमन जास्त आहे. त्यामुळे येथे संक्रमणाचा धोका अधिक आहे. अशावेळी मौदा शहरात कोराना प्रतिबंधक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.