२७ आयुक्तांच्या विरोधात विकास ठाकरे यांचा हक्कभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:12+5:302021-09-26T04:10:12+5:30
विधानसभा कार्यकारी अध्यक्षांना दिले निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीनंतरही महापालिकांव्दारे वसूल करण्यात ...
विधानसभा कार्यकारी अध्यक्षांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीनंतरही महापालिकांव्दारे वसूल करण्यात आलेल्या कराबाबत चुकीची माहिती आणि पत्राला प्रतिसाद न देणाऱ्या राज्यातील २७ महापालिका आयुक्तांविरुध्द काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी हक्कभंग नोटीस दिली आहे.
जीएसटी स्वरूपात नागरिकांकडून विविध स्वरुपाचा कर वसूल केला जातो. असे असतानाही महापालिकांनी विविध स्वरुपाचा कर वसूल केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले असता काहींनी उत्तर दिले नाही. काहींनी चुकीची माहिती दिली. याबाबत विकास ठाकरे यांनी विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची शुक्रवारी मुंबईत भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. कर वसुलीसंदर्भात मागील तीन महिन्यात गोळा केलेले दस्तऐवज पुरावे म्हणून झिरवाळ यांना सादर केले.
महापालिकांनी चुकीच्या पध्दतीने कर वसुली केली. यासंदर्भात आयुक्तांना पत्र पाठविल्यानंतर काहींनी त्याची दखल घेतली नाही तर काहींनी चुकीची माहिती दिली. सरकारची आणि लोकांची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या आयुक्ताविरुध्द हक्कभंग आणि अवमानासाठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे यांनी निवेदनाव्दारे केली.
...
सरकारकडून नागपूर मनपाला मिळालेले अनुदान
१७ जुलै २०१७ ते जून २०२१
३८५१.५१ कोटी जीएसटी स्वरुपात
३६० कोटी रुपये मुद्रांक शुल्क
२५९७.३१ कोटी रुपये कर स्वरुपात नागरिकांकडून वसुली
३३.०६ कोटी जाहिरात कर स्वरुपात वसुली
१७.२३ कोटी रुपये जाहिरात एजन्सीकडून कर वसुली