राजकारण्यांकडूनच काेराेना प्राेटाेकालचे उल्लंघन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:12 AM2021-08-21T04:12:49+5:302021-08-21T04:12:49+5:30
अंकिता देशकर नागपूर : मुंबई पाेलिसांनी गुरुवारी नारायण राणे यांच्या नेतृत्वात काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे आयाेजक व भाजपा कार्यकर्त्यांवर काेराेना ...
अंकिता देशकर
नागपूर : मुंबई पाेलिसांनी गुरुवारी नारायण राणे यांच्या नेतृत्वात काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे आयाेजक व भाजपा कार्यकर्त्यांवर काेराेना प्रतिबंधक प्राेटाेकाॅलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. इकडे नागपुरातही हाेणाऱ्या राजकीय कार्यक्रम व आंदाेलनात काेराेना प्राेटाेकालचे सर्रास उल्लंघन हाेत आहे. राजकारणी नकार देत असले तरी कार्यकर्त्यांद्वारे साेशल मीडियावर अपलाेड हाेणाऱ्या फाेटाेमधून नियमांची सर्रास पायमल्ली हाेत असल्याचे दिसून येत आहे. यावरून नियम पाळण्याबाबत कुणालाही चिंता नसल्याचे म्हणावे लागेल.
नुकतेच काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या सत्कार समाराेहाप्रसंगी सभागृह भरले हाेते. यापूर्वी युवक काॅंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या माेर्चात चांगलीच गर्दी जमली हाेती. यादरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे सुद्धा सहभागी हाेते. राष्ट्रवादीनेही खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयाेजन केले.
दुसरीकडे भाजपाचे नेतेही याबाबतीत मागे नाहीत. पक्षाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी साेशल मीडियावर अपलाेड केलेल्या अनेक फाेटाेंमधून कार्यकर्त्यांनी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. या फाेटाेंमध्ये कार्यकर्त्यांसह बावनकुळे सुद्धा काेराेना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. हेल्मेट न वापरता माेटरसायकल चालवित आहेत आणि पक्षाचे इतर नेतेही त्यांचे अनुकरण करीत आहेत.
शिवसेना आणि त्यांच्या युवा सेनेचीही रविभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये माेठी गर्दी झाल्याचे दिसून येते. बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांच्या उपस्थितीत झालेल्या संमेलनातही गर्दी झाली हाेती. राजकारण्यांच्या कार्यक्रमात नियमांची पायमल्ली हाेत असताना नागपूर पाेलीस मात्र माैन आहेत. याबाबत संपर्क केला असता पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले.