दोन गटांत जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:23+5:302021-04-25T04:08:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शुक्रवारी तलावात मासे पकडण्याच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. चाकू, लोखंडी रॉड आणि ...

Violent fighting between the two groups | दोन गटांत जोरदार हाणामारी

दोन गटांत जोरदार हाणामारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शुक्रवारी तलावात मासे पकडण्याच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. चाकू, लोखंडी रॉड आणि काठ्यांचा वापर करून आरोपींनी एकमेकांवर हल्ला चढवल्याने सहा जण जबर जखमी झाले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अग्रसेन चाैकाजवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

शारीक खान आणि शहानूर मिर्झा बेग यांनी पोलिसांकडे परस्परांविरोधी नोंदविलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन्ही गटांतील आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले. शारीकच्या तक्रारीनुसार, तो, त्याचा भाऊ फैजान खान ऊर्फ काल्या त्यांच्या तीन मित्रांसोबत शुक्रवारी रात्री घराजवळ बसून होते. तेवढ्यात तेथे आरोपी शेख शोएब, मोहम्मद एहफाज, शहानूर मिर्झा बेग त्यांच्या साथीदारांसह आले. त्यांनी फैजान आणि मित्रांवर दगडफेक केली. एकाने शारीकवर चाकू हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. वार चुकल्याने शारीक बचावला. तर दुसऱ्याने काठीने त्याचे डोके फोडले. त्यामुळ तो आणि त्याचा भाऊ तसेच मित्र जबर जखमी झाले.

दुसऱ्या गटाचा शहानूर मिर्झा बेग याच्या तक्रारीनुसार, रहिम खान फारुख खान आणि शेख शोएब हे त्यांच्या मित्रांसह शुक्रवारी तलावात मासे पकडत असताना आरोपी फैजान खानचा शोएबसोबत वाद झाला. हा वाद वाढू नये म्हणून बाकीच्या तरुणांनी मध्यस्थीसाठी शहानूरला फैजानच्या घराजवळ बोलवले. तेथे आरोपींनी हल्ला करण्यासाठी आल्याचा गैरसमज करून घेत त्यांच्यावर दगड भिरकावले. नंतर फैजान ऊर्फ काल्याने शोएबवर तलवारीने तर बाकी मित्रांवर लाठ्या, दंड्यांनी हल्ला चढवला. आरोपींनी एकमेकांच्या वाहनांची तोडफोड करून दोन दुचाक्या पेटवून दिल्या. या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच तहसील ठाण्याचे पथक तिकडे धावले. तत्पूर्वीच आरोपी पळून गेले.

---

दोघांना अटक

रात्री आरोपी शारीक आणि शहानूर या दोघांनी परस्परांविरोधी तक्रारी नोंदवल्या. पोलिसांनी दोन्ही गटांवर गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे तसेच प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले. आरोपी शारीक खान आणि रहीम खानला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: Violent fighting between the two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.