‘माफसू’चा ‘व्हीआयपी’ दीक्षांत समारंभ

By admin | Published: March 7, 2017 02:09 AM2017-03-07T02:09:00+5:302017-03-07T02:09:00+5:30

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा (माफसू) आठवा दीक्षांत समारंभ ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.

'VIP' Convocation ceremony of 'Mafsu' | ‘माफसू’चा ‘व्हीआयपी’ दीक्षांत समारंभ

‘माफसू’चा ‘व्हीआयपी’ दीक्षांत समारंभ

Next

राज्यपाल, मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा (माफसू) आठवा दीक्षांत समारंभ ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ््याला अतिमहत्त्वाच्या मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याने हा ‘व्हीआयपी’ दीक्षांत समारंभ ठरणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना विद्यापीठातर्फे ‘डीएसस्सी’ (डॉक्टरेट आॅफ सायन्स) ही पदवी देण्यात येणार आहे.
डॉ.वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे सकाळी १० वाजता हे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती चे.विद्यासागर राव हे अध्यक्षस्थानी असतील. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे राहतील. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याशिवाय राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर, डॉ.त्रिलोचन मोहापात्रा उपस्थित राहतील.(प्रतिनिधी)

सरसंघचालक स्वीकारणार पदवी
डॉ.मोहन भागवत हे स्वत: नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांना ‘डीएसस्सी’ या पदवीने सन्मानित करण्यासंदर्भात विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने प्रस्ताव मंजूर केला व त्यानंतर राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्याकडे तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. पशुविज्ञान शाखेचे पदवीधर असलेले डॉ.भागवत ‘डीएसस्सी’ ही पदवी स्वीकारणार की नाही, याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. भागवत हे स्वत: सोहळ््याला उपस्थित राहणार असून ते पदवीदेखील स्वीकारतील, अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.एस.बी.आखरे यांनी दिली.

Web Title: 'VIP' Convocation ceremony of 'Mafsu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.