ड्रॅगन पॅलेस परिसरात विपश्यना केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:51 AM2017-09-15T00:51:09+5:302017-09-15T00:51:32+5:30

ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठीची जागतिकस्तरावर ओळख झाली. आता ड्रॅगन पॅलेस परिसरात तब्बल १० एकर जागेमध्ये भव्य विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे.

Vipassana center in the Dragon Palace area | ड्रॅगन पॅलेस परिसरात विपश्यना केंद्र

ड्रॅगन पॅलेस परिसरात विपश्यना केंद्र

googlenewsNext
ठळक मुद्देमध्य भारतातील अप्रतिम शिल्पाकृती : राष्ट्रपतींच्या हस्ते २२ ला उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठीची जागतिकस्तरावर ओळख झाली. आता ड्रॅगन पॅलेस परिसरात तब्बल १० एकर जागेमध्ये भव्य विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. ही वास्तू म्हणजे मध्य भारतातील अप्रतिम अशी शिल्पाकृती आहे. या भव्य वास्तूचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापक आणि राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी याबाबत गुरुवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणाºया या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. तर विशेष अतिथी म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव राहतील.
प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले उपस्थित राहतील. मेडिटेशन सेंटरच्या उद्घाटनानंतर ड्रॅगन पॅलेसमध्ये विशेष बुद्धवंदना होईल.
८३ फूट उंचीचा पॅगोडा
या अप्रतिम विपश्यना मेडिटेशन सेंटरचा बांधकाम आराखडा महाराष्ट्र व गुजरात येथील शिल्पतज्ज्ञांनी तयार केला असून, यामध्ये गुजरातमधील प्रसिद्ध शिल्पतज्ज्ञ ठाकूरभाई पारेख यांचा समावेश आहे. स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून पी. टी. मसे असोसिएटस् यांनी काम केले आहे. पॅगोडाच्या सभोवताल उत्कृष्ट आकर्षक, कलात्मक शिल्पाकृती चेन्नई तामिळनाडू येथील ८० कुशल कारागिरांनी साकार केली आहे. तर इगतपुरी येथील १५० कुशल कारागिरांनी उत्कृष्ट बांधकाम केले आहे. भूपृष्ठापासून ८३ फूट उंचीचा मुख्य पॅगोडा बांधण्यात आला असून, पॅगोडाच्या चारही बाजूला १० फूट उंचीचे चार पॅगोडा तयार करण्यात आले आहेत. या पॅगोडाला देण्यात आलेला सोनेरी रंग हा थायलंडवरून मागवला आहे.
१२५ साधक करू शकतील धम्मसाधना
मेडिटेशन सेंटरच्या तळमजल्यावर ध्यानसाधनेकरिता २४ शून्यागार बांधण्यात आले आहेत. पहिल्या व दुसºया मजल्यावर तीन हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे वर्तुळाकार धम्मसभागृह तयार करण्यात आले आहे. यामध्ये १२५ साधक एकाच वेळेस सामूहिक धम्मसाधना करू शकतील. मेडिटेशन सेंटरमध्ये १२५ पुरुष व महिला साधकांकरिता स्वतंत्र व सुसज्ज सुविधायुक्त अशी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. २४०० चौरस फूट क्षेत्रफळामध्ये सामूहिक निवास व्यवस्थेकरिता डॉरमेंटरी हॉल बांधण्यात आले असून,भोजन व्यवस्थेकरिता १४०० चौरस फुटाचे दोन स्वतंत्र भोजनकक्ष बांधण्यात आले आहेत.

Web Title: Vipassana center in the Dragon Palace area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.