विपश्यनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी : अॅड. कुंभारे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:10 AM2021-09-23T04:10:57+5:302021-09-23T04:10:57+5:30
नागपूर : ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी ध्यान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. यावेळी माेठ्या संख्येने विपस्वी ...
नागपूर : ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी ध्यान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. यावेळी माेठ्या संख्येने विपस्वी साधकांनी सहभाग घेतला. आचार्य डहाट यांनी साधकांना मार्गदर्शन केले. यावेळी बाेलताना मागासवर्गीय आयाेगाच्या सदस्या अॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, वर्तमान परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती दुखी आहे. त्यातून मुक्तीसाठी तथागत बुद्धाने व्यवहारिक मार्गाच्या माध्यमातून विपश्यनेचा मार्ग दिला आहे. मनाचे विकार दूर करण्यासाठी विपश्यना महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे संपूर्ण जगात हा मार्ग स्वीकारला जाताे. त्यामुळे याेगाच्या धर्तीवर विपश्यनेलाही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी, अशी भावना अॅड. कुंभारे यांनी व्यक्त केली. यासाठी पंतप्रधान माेदी यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कमलताई गवई यांनीही साधकांना मार्गदशर्न केले. आयाेजनात सुनील वानखेडे, सचिन नेवारे, विनय बांबाेर्डे, रेखा भावे, वंदना आळे, सुमन घरडे, शालू सावतकर, चंद्रजित नागदेवे, देवळे, धम्मसेवक रामटेके, भीमराव हाडके, चंदू कापसे आदींचा सहभाग हाेता.