नागपूर मनपा आयुक्तपदी वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 10:06 PM2018-05-02T22:06:11+5:302018-05-02T22:06:25+5:30
महापालिका आयुक्तपदी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंधरा दिवसापूर्वी १६ एप्रिलला आयुक्त अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून आयुक्तपद रिक्त आहे. मुदगल यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्तपदी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंधरा दिवसापूर्वी १६ एप्रिलला आयुक्त अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून आयुक्तपद रिक्त आहे. मुदगल यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार वीरेंद्र सिंग शनिवार किंवा सोमवारी पदभार स्विकारण्याची शक्यता नाहे. वीरेंद्र सिंग २००६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून शिस्तप्रिय असल्याची माहिती आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेला या संकटातून बाहेर काढतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे. यासंदर्भात कोणत्या उपाययोजना करतात याकडे लक्ष लागले आहे.
बुधवारी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव(प्रशासन) मुके श खुल्लर यांनी वीरेंद्र सिंग यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याबाबतचे पत्र जारी केले आहे. अश्विन मुदगल यांच्याकडून तातडीने आयुक्तपदाचा पदभार स्विकारण्यास सांगितले आहे. अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर वीरेंद्र सिंग यांची आयुक्तपदी नियुक्त होतील. अशी चर्चा होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.
मुदगल यांनी सभापतीपदाची सूत्रे स्किारली
अश्विन मुदगल यांनी बुधवारी नासुप्र सभापती व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. नासुप्रचे महाव्यवस्थापक अजय रामटेके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुदगल यांनी पदग्रहण करताच नासुप्र व महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आढावा घेत संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेंथे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार,अधीक्षक अभियंता (प्रकल्प) राजीव पिंपळे, कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.