डाक विभागात व्हर्च्युअल डेबिट कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 11:12 AM2020-12-18T11:12:13+5:302020-12-18T11:12:36+5:30
Nagpur News postal department डाक विभागाने व्हर्च्युअल डेबिट कार्ड (व्हीडीसी) आणले असून ते मोबाईलवर दिसणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डाक विभागाने व्हर्च्युअल डेबिट कार्ड (व्हीडीसी) आणले असून ते मोबाईलवर दिसणार आहे. या कार्डाकरिता इच्छुकाचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत असणे आवश्यक आहे. यात व्हीडीसी एक पर्याय दिला आहे. त्याला डाऊनलोड करताच यामध्ये रकमेची मर्यादा निर्धारित केली जाऊ शकते. यात बदलही करता येऊ शकतो. खातेधारक याला इच्छेनुसार अस्थायी वा स्थायीरीत्या ब्लॉक करू शकतो. यासह विभागाने यूपीआय पोर्टलरूपात डाक पे सुरू केले आहे. याच्या माध्यमातून भुगतान करता येऊ शकते.