दीक्षाभूमीवर धम्मरॅलीचे विराट दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:03 AM2017-08-12T01:03:25+5:302017-08-12T01:04:14+5:30

शांती आणि सद्भावनेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली सुरू आहे.

Vishal Darshan of Dhamarali on Dikshitabhoomi | दीक्षाभूमीवर धम्मरॅलीचे विराट दर्शन

दीक्षाभूमीवर धम्मरॅलीचे विराट दर्शन

Next
ठळक मुद्देरविवारी समारोप : महिनाभरात ४०० विहारांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शांती आणि सद्भावनेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली सुरू आहे. गेल्या महिनाभरात या रॅलीदरम्यान पायी फिरून शहरातील तब्बल ४०० विहिरांना भेट देण्यात आली. येत्या रविवारी १३ आॅगस्ट रोजी या धम्मरॅलीचा दीक्षाभूमीवर समारोप होणार असून यावेळी हजारो धम्मबांधव सहभागी होतील, असा विश्वास भदंत ज्ञानबोधी आणि पी.एस. खोब्रागडे (श्रमण पय्याधम्मा) यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. अनाथपिंडक परिवारातर्फे काढण्यात येत असलेल्या धम्मरॅलीचे हे तिसरे वर्ष आहे. यंदा तब्बल २०० श्रमण भिक्खू या धम्मरॅलीत सहभागी झाले आहेत. दररोज किमान १५ ते २० किमी पायी चालून शहरातील विविध विहारांना भेटी देण्यात आली. आतापर्यंत ४०० विहारांना भेटी देण्यात आल्या आहेत. शहरात शांती व सद्भाव कायम राहावा, यासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न या धम्मरॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. १३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता भीम चौक जरीपटका येथून या समारोपीय धम्मरॅलीला सुरुवात होईल. इंदोरा चौक, गड्डीगोदाम, एलआयसी, संविधान चौकमार्गे ही धम्मरॅली दीक्षाभूमीवर पोहोचेल. रस्त्यात ठिकठिकाणी धम्मरॅलीचे स्वागत केले जाईल.
पत्रपरिषदेत श्रमण गौतम पाटील, अमन कांबळे, सागर डबरासे, प्रितम बुलकुंडे, राजू झोडापे, शिशुपाल कोल्हटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Vishal Darshan of Dhamarali on Dikshitabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.