उदयनिधीच्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषद नाराज, मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची मागणी
By कमलेश वानखेडे | Published: September 6, 2023 06:16 PM2023-09-06T18:16:23+5:302023-09-06T18:18:13+5:30
राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाने हस्तेक्षेप करण्याची विनंती
नागपूर : तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पूत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात विश्व हिंदु परिषदेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. उदयनिधी यांना तत्काळ मंत्रीमंडळातकून बरखास्त करावे व या प्रकरणी राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी विनंती विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे बुधवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले, या संदर्भात सुमारे अडीचशे लोकांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्बात तामिळनाडूच्या राज्यपालांनीही दखल घेत सरकारला जाब विचारायला हवा. उदयनिधी यांचे वक्तव्य मुर्खपणाचे आहे. सनातन धर्म अनादी काळापासून आहे. हा धर्म वसुौव कुटुंबकम च्या सिद्धांतावर चालतो. सर्वांना संरक्षण देतो. तो कधी संपुष्टात येऊ शकत नाही. उदयनिधी यांचे आजोबा व माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी देखील हिंदू-हिंदी व रामसेतु चा विरोध केला होता, असेही त्यांनी सांगितले.
सुनियोजीत पद्धतीने उदयनिधी स्टॅलीन, कार्ती चिदंबरम, स्वामीप्रसाद मौर्य, मल्लाकार्जुन खर्गे व त्याचामुलगा यांचे सनातन धर्मावर टिका करण्याकरिता विषवमन करणारे वक्तव्य येत आहेत हीच पद्धत काश्मीर मध्ये अवलंबिली गेली होती. राजकीय पक्षांनी हिंदू समाजाला गृहीत धरून त्यांचा व त्यांच्या श्रद्धांचा अपमान केल्यास खपवून घेतला जाणार नाही. सनातन धर्माला कलंक लावण्याचा प्रयत्न कुणी केला तर विश्व हिंदू परिषद आपल्या नेतृत्वात सर्व सनातनी हिंदूंच्या साहाय्याने तो निष्प्रभ करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
देशाचे नाव भारत करण्याच्या चर्चेबाबत शेंडे म्हणाले, इंडिया हे नाव इंग्रजांनी दिले होते. ‘भारत माता की जय’ म्हटल्यावर जोश येतो. आम्ही देशाला भारत असेच संबोधतो. प्राचीनकाळापासून देशाचे हेच नाव आहे. त्यामुळे आपणही इंडिया ऐवजी भारत म्हणायला हवे. पत्रकार परिषदेला विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे, प्रांत प्रचार प्रमुख निरंजन रिसालदार व महानगर मंत्री अमोल ठाकरे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?
- उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याबाबत इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेंडे यांनी केली. हिंदुचा अपमान करणाऱ््या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. नाराजी व्यक्त केली नाही. याचा अर्थ ते या वक्तव्याशी सहमत आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही शेंडे यांनी केली