गांधी जयंतीदिनी ६६८ व्यक्तींच्या सेवाग्राम आश्रमाला भेटीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 07:57 PM2018-10-02T19:57:33+5:302018-10-02T19:58:24+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंगळवारी भारतासह जगात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व राजकीय राजधानी असलेल्या सेवाग्राम आश्रमात आज अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष येत गांधी विचार जाणून घेतले असले तरी सायंकाळी उशीरापर्यंत ६६८ व्यक्तींनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्याची नोंद आश्रम प्रतिष्ठाने घेतली असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंगळवारी भारतासह जगात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व राजकीय राजधानी असलेल्या सेवाग्राम आश्रमात आज अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष येत गांधी विचार जाणून घेतले असले तरी सायंकाळी उशीरापर्यंत ६६८ व्यक्तींनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्याची नोंद आश्रम प्रतिष्ठाने घेतली असल्याचे सांगण्यात आले.
३५ हजार मिटर सूतकताई
बापुंच्या जयंतीचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानात सूतकताई उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ३५ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत ३५ हजार मिटर सूतकताई झाली. त्याची नोंद आश्रम प्रतिष्ठानने घेतली आहे.