मृताच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट
By admin | Published: September 15, 2016 03:07 AM2016-09-15T03:07:09+5:302016-09-15T03:07:09+5:30
तालुक्यातील सावंगी (देवळी) येथील हरतालिका पूजेसाठी गेलेल्या पाच तरुणींसह एका महिलेचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सावंगीतील जलसमाधीप्रकरण : समीर मेघे यांच्यातर्फे आर्थिक मदत
हिंगणा : तालुक्यातील सावंगी (देवळी) येथील हरतालिका पूजेसाठी गेलेल्या पाच तरुणींसह एका महिलेचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची आता समितीद्वारे चौकशी केली जात आहे. दरम्यान, आ. समीर मेघे यांनी मृताच्या कुटुंबीयांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रामगिरीवर भेट घेतली. आ. मेघे यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देताना पीडित कुटुंबाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून पीडित कुटुंबीयांना पूर्ण मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज आष्टणकर, विशाल भोसले, सरपंच पुरुषोत्तम गोतमारे, विनायक आष्टणकर, ईश्वर चौधरी, रामप्रसाद राऊत, शंकर कामलाटे, तुळशीराम डडमल, महेंद्र नागोसे, जागेश्वर काळे, मनोज जाधव, बाबा येनुरकर, हुसेनजी नागस्वार, रामभाऊ मोहीतकर, मधुकर कलके, गणेश नागपुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)